Andhra Pradesh Accident : लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 8 ठार

लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या लॉरीने त्यांच्या कारला भीषण टक्कर दिली. अपघात इतका भीषण होता की यात कारमधील नऊ जण जागीच ठार झाले असून गाडीचा चेंदामेंदा झालाय.

Andhra Pradesh Accident : लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 8 ठार
लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 9 ठार
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 12:55 AM

आंध्र प्रदेश : भरधाव वेगात आलेली लॉरी(Lorry)ने कारला टक्कर मारल्याने कार(Car)मधील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात जिल्ह्यात घडली आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. सर्व मयत उरवाकोंडा येथील रहिवासी असून कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे लग्नासाठी गेले होते. लग्नाहून आपल्या गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उरवाकोंडा पोलीस करत आहेत. अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटली नसून पोलीस मृतांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. (9 killed in Andhra Pradesh car and lorry crash)

लग्नाहून परतताना भीषण अपघात

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकातील बेल्लारी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उरवाकोंडा येथील एक कुटुंब आपल्या इनोव्हा कारने गेले होते. लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या लॉरीने त्यांच्या कारला भीषण टक्कर दिली. अपघात इतका भीषण होता की यात कारमधील नऊ जण जागीच ठार झाले असून गाडीचा चेंदामेंदा झालाय. या घटनेमुळे उरवाकोंडा गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

आंध्र प्रदेशमध्ये अपघाताचे सत्र सुरुच

आंध्र प्रदेशमध्ये 14 जानेवारी रोजी पश्चिम गोदावरी जिल्ह्यात असाच भीषण अपघात घडला होता. या अपघाता चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर 10 जण जखमी झाले होते. मासे घेऊन जाणारा ट्रक नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्ग 216 वरील ताडेपल्लीगुडेम मंडलातील कोंद्रुप्रोलू येथे उलटला. यात ट्रकमधील चार मजुरांचा मृत्यू झाला तर 10 मजूर जखमी झाले. हा ट्रक विशाखापट्टणम जिल्ह्यातील दुव्वाडा येथून पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंगतुरु मंडलातील नारायणपूरला जात होता. (9 killed in Andhra Pradesh car and lorry crash)

इतर बातम्या

Amaravati Drown : अमरावतीत घोंशी धरणात तीन जण बुडाले, मायलेकींचा मृत्यू तर पतीला वाचवण्यात यश

तीन मुलांच्या आईचा फेसबुक मित्रावर जीव जडला, मग पैशासाठी प्रियकराचा अमानुष छळ केला, वाचा नेमके प्रकरण काय ?

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.