पंतप्रधान मोदींचा मास्क घालण्यास नकार; ‘त्या’ व्हिडीओवरुन सोशल मीडियावर ट्रोल

एरवी पंतप्रधान मोदी सतत आपल्या भाषणांमधून नागरिकांना 'दो गज की दुरी' पाळण्याचे आणि मास्क परिधान करण्याचे आवाहन करत असतात. | PM Narendra Modi

पंतप्रधान मोदींचा मास्क घालण्यास नकार; 'त्या' व्हिडीओवरुन सोशल मीडियावर ट्रोल
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 1:46 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका कार्यक्रमात मास्क (Mask) घालण्यास नकार दिल्याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ”मास्क घाला, मोदींजींसारखे वागू नका’, अशी कॅप्शन या व्हिडीओसोबत लिहण्यात आली आहे. (PM Narendra Modi refusing to wear a mask video viral on Social Media)

त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर आणखीनच व्हायरल झाला. अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीवर टीका करत आहेत. एरवी पंतप्रधान मोदी सतत आपल्या भाषणांमधून नागरिकांना ‘दो गज की दुरी’ पाळण्याचे आणि मास्क परिधान करण्याचे आवाहन करत असतात. मात्र, आता मोदींनीच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा नियम बाजूला सारल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमके काय घडले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तकला मेळाव्याला भेट दिली होती. यावेळी मोदी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या गोष्टी पाहत होते. याठिकाणी फिरताना मोदींच्या तोंडावर मास्क नव्हता. तेव्हा एका स्टॉलवरील माणसाने पंतप्रधान मोदी यांना मास्क देऊ केला. समोरील व्यक्ती गुजराती भाषेत बोलताना ऐकू येत आहे. वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देताना व्हिडीओत दिसत आहेत.

त्यानंतर पंतप्रधान मोदी तसेच पुढेही निघून गेले. विशेष म्हणजे या व्हिडीओत नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी मास्क परिधान केले आहेत. मात्र, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत ‘आप’कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

‘आम्ही तुमच्या सारख्या खोट्या कोरोना टेस्ट करत नाही’

योगी आदित्यनाथ यांना उठता-बसता दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्ष दिसतो. कोरोना संकट काळात आम्ही केलेल्या चांगल्या कामांची स्तुती उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गल्लीत सुरु आहे. तुमच्यासारखं आम्ही खोट्या कोरोना टेस्ट करत नाहीत. बाकी तुमच्या मंत्र्यांच्या आमंत्रणानंतर आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया 22 डिसेंबर रोजी लखनऊला डिबेटसाठी येत आहेत, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांनी केले होते.

संबंधित बातम्या:

Corona Vaccine Update : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, देशातील पहिलं लसीकरण उत्तर प्रदेशात

मेड इन इंडिया, नो साईड इफेक्ट, Covaxin रामबाण ठरणार?

आठ आठवड्यांच्या बाळाला 16 कोटींचं इंजेक्शन, ‘हा’ आहे जगातील सर्वात महाग आजार

(PM Narendra Modi refusing to wear a mask video viral on Social Media)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.