संतापजनक! एकतर्फी प्रेमातून महिलेवर अॅसीड हल्ला; आरोपीने पोलिसांवरही केला गोळीबार
दिल्लीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफीरू तरुणाने महिलेवर अॅसीड हल्ला (Acid attack) केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफीरू तरुणाने महिलेवर अॅसीड हल्ला (Acid attack) केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी 23 वर्षीय तरुणाने पीडित महिलेला भेटण्याच्या बाहाण्याने आपल्या घरी बोलावले. महिला घरी येताच तिला दोरीने बांधले आणि तिच्यावर अॅसीड फेकले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर आरोपीला बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांवर गोळीबार
दिल्लीमधील बवाना परिसरातील ही घटना आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा सशंय पोलिसांनी व्यक्त केलाय. हल्ल्यानंतर आरोपी बिहारमध्ये पळून गेला होता. त्याला बक्सर जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस आल्याचे कळताच त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. गोळीबारामध्ये आरोपी मोंटू हा जखमी झाला आहे. त्याला दिल्लीमध्ये आणण्यात आले असून, त्याच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पिडीता आणि आरोपी एकाच गावातील
पीडित महिला ही विवाहित असून, तिच्या पतीसोबत ती दिल्लीमध्ये राहात होती. तीचा पती एका स्थानिक कारखान्यामध्ये कामाला होता. आरोपी मोंटू हा देखील पीडितेच्याच गावचा रहिवासी आहे. आरोपी या महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. पतीला सोडून तू माझ्यासोबत राहायला ये अशी मागणी आरोपी वारंवार या महिलेकडे करत होता. मात्र तसे करण्यास महिलेने नकार दिल्याने, आरोपीने तिच्यावर अॅसीड हल्ला केला. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून,तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या पोलीस या आरोपीची चौकशी करत आहेत.
MP Sex Racket: शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींसह 3 ग्राहकांना अटक#ShivSena #MadhyaPradesh #SexRacket #crime https://t.co/lKgpBHhUJf
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021
संबंधित बातम्या
Bhopal fire: कमला नेहरू हॉस्पिटलच्या चिल्ड्रेन वार्डमध्ये भीषण आग, चार मुलांचा मृत्यू
