मोठी बातमी! टॅरिफनंतर गेम फिरला, रशिया, चीननंतर आता आणखी एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाचा थेट मोदींना फोन
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्मण घेतला आहे, मात्र त्यानंतर भारताला मिळणाऱ्या समर्थनात वाढ होताना दिसत आहे. चीन, रशियानंतर आता आणखी एका देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी पेनल्टी म्हणून टॅरिफमध्ये अतिरिक्त 25 टक्के वाढ केली. येत्या 28 ऑगस्टपासून अमेरिकेकडून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. या टॅरिफचा भारतावर फार काही परिणाम होणार नसल्याच मतं आतंरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.
मात्र अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आता भरताला मिळणाऱ्या समर्थनामध्ये वाढ होत आहे. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीनकडून अमेरिकेला सुनावण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत. दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देखील दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे रशिया, चीन आणि भारतामधील जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे.
तर दुसरीकडे आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. त्यांनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे. तसेच युक्रेन-भारतामधील सहकार्य वाढवण्यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे, विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीपूर्वी ही चर्चा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
Glad to speak with President Zelenskyy and hear his perspectives on recent developments. I conveyed India’s consistent position on the need for an early and peaceful resolution of the conflict. India remains committed to making every possible contribution in this regard, as well…
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2025
ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताला चीन आणि रशिया पाठिंबा देत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे.
