AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजूची चार दिन की चांदनी संपली, अचानक येऊ लागली भारताची आठवण

एकीकडे सीमा हैदर पाकिस्तानातून आपल्या चार मुलांना घेऊन नोएडाच्या सचिन मीना याला भेटायला आली. तर दुसरीकडे अंजू आपला संसार सोडून पाकिस्तानातील नसरुल्ला या प्रियकराला भेटायला गेली आहे

अंजूची चार दिन की चांदनी संपली, अचानक येऊ लागली भारताची आठवण
anju Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 10, 2023 | 7:02 PM
Share

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : राजस्थानातील अलवर येथून आपला संसार आणि मुलाबाळांना सोडून पाकिस्तानात गेलेल्या अंजू हीला आता आपल्या मायदेशाची आठवण येत आहे. आपण इकडे खूप दु:खी आहोत. दिवस रात्र आपल्याला मुलांची आठवण येत आहे. माझ्यामुळे पालकांची खूपच बदनामी झाली आहे. याला मीच जबाबदार आहे. आपल्याला भारतात येऊन सर्व परिस्थितीला सामोरे जायचे असल्याचे अंजू हीने म्हटले आहे.

एकीकडे सीमा हैदर पाकिस्तानातून आपल्या चार मुलांना घेऊन नोएडाच्या सचिन मीना याला भेटायला आली. तर दुसरीकडे अंजू आपल्या पाकिस्तानातील नसरुल्ला या प्रियकराला भेटायला आपल्या मुलांना सोडून गेली आहे. तिकडे अंजूचे स्वागत करण्यात आले असून त्यांना मोठे घर आणि नोकरी तसेच महागडी गिफ्ट देण्यात आली आहेत. अंजू तिकडे जाऊन फातिमा झाल्याने तिच्या आई-वडीलांनी खूपच टीका केली होती.

कोणी जबरदस्ती केलेली नाही

अंजूने म्हटले आहे की पाकिस्तानात येण्याचा माझा स्वत:चा निर्णय होता. परंतू येथे आल्यानंतर हे प्रकरण इतके वाढेल असे वाटले नव्हते. त्या प्रेशरमुळे मी परत भारतात येऊ शकली नाही. परंतू सर्वकाही नॉर्मल झाल्यावर मला भारतात माझ्या मुलांना भेटायला जायचे आहे. त्यांना मी दिवसरात्र मिस करीत आहे. त्यामुळे यासाठीच मी खूपच दु:खी आहे. आपण आधीही मुलांना एकटे सोडले आहे असे अंजूने म्हटले आहे. अंजूने म्हटले आहे की आपण भारतात परत जाण्यास तयार आहे. मला सर्वांना सामोरे जायचे आहे. मी लोकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहे, तेथे जाऊन मी सर्वांना सांगणार आहे की माझ्या मर्जीने येथे आले आहे. कोणी माझ्यावर जबरदस्ती केलेली नाही. येथे मला खूप चांगले ठेवले असल्याचेही तिने म्हटले आहे.

अंजू हीच्या व्हिसाची मुदत संपायला आली

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या व्हीसात वाढ केल्याचे म्हटले जात आहे. परंतू बीबीसीने दिलेल्या बातमीत व्हीसाची मुदत वाढविण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे. नसरुल्लाने म्हटले आहे की व्हीसाची मुदत वाढविण्यासाठी अर्ज केला होता. परंतू त्यावर काही निर्णय झालेला नाही. या प्रक्रीयेसाठी 10-15 दिवस लागू शकतात असे त्याने स्पष्ट केले आहे. आता व्हिसाची मुदत वाढवायची की नाही हे आता त्यांच्या हातात आहे. तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्याकडे असे कोणतेही दस्ताऐवज आलेले नसल्याचे म्हटले आहे. अंजू हीच्या व्हिसाची मुदत येत्या 21 ऑगस्टपर्यंतच आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा