AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ragging Death: रॅगिंगचा आणखी एक बळी, विद्यापीठात मिळाला बीबीएच्या विद्यार्थ्याचा मृतदेह

रॅगिंगचे प्रकार थांबलेले नाहीत, याचे आणखी एक उदाहरण समोर आलेले आहे.

Ragging Death: रॅगिंगचा आणखी एक बळी, विद्यापीठात मिळाला बीबीएच्या विद्यार्थ्याचा मृतदेह
आणखी एक बळी
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 2:59 PM
Share

सोनिपत – एका 19 वर्षांच्या बीबीएला शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा (BBA Student)मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कॅंपसमध्ये (campus)होत असलेल्या रँगिंगमुळेच (ragging) या विद्यार्थ्याचा जीव गेला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सातत्याने होत असलेल्या रँगिंगमुळे हा विद्यार्थी सातत्याने निराश राहत होता, असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात चौकशी करत असलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत असल्याचे सांगितले आहे. मात्र या प्रकरणात त्यांनी अद्याप रॅगिंग झाल्याचा कोणताही उल्लेख वा वक्तव्य केलेले नाही.

मृत विद्यार्थ्याचे नाव संस्कार चतुर्वेदी असे आहे. तो गुजरातच्या बडोद्याचा रहिवासी आहे. सोनीपत येथील ओ पी जिंदाल विद्यापीठात मृत विद्यार्थी बिझनेस एडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास करीत होता.

पोलिसांसाठी विद्यार्थ्याचा गूढ मृत्यू

या प्रकरणात या मृत विद्यार्थ्याच्या बहिणीच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सोनीपतच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. सध्या तरी पोलिसांसाठी हा मृत्यू एक गूढ आहे. या विद्यार्थ्याबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात सर्व अँगल्सनी तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोस्टमार्टेमनंतर कळणार मृत्यूचे कारण

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे – मृत विद्यार्थी संस्कार हा दिल्लीत आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर रविवारी त्याचा मृतदेह विद्यापीठाच्या परिसरात सापडला आहे. या प्रकरणात आता चौकशी आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर अल्यानंतर त्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकेल. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

मृत संस्कारच्या भावाने काय सांगितले

संस्कारच्या चुलतभावाने माध्यमांना सांगितले की – माझा भाऊ सेंकड इअरचा विद्यार्थी होता. त्याचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनपर्यंत त्याच्या मृत्युचे कारण समजू शकलेले नाही. त्याच्याशी आपले बोलणे झाले होते, त्यावेळी तो तणावात होता, असेही त्याच्या चुलतभावाने सांगितले आहे.

कँपसमध्ये त्याच्यावर रॅगिंग करण्यात येत होते. तो विद्यापीठात अनेक अडचणींचा सामना करीत होता. मात्र त्या अडचणी नेमक्या काय होत्या, याचा उलगडा भावाने केलेला नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी गांभिर्याने करावी, अशी विनंती त्यांना करीत असल्याचेही या भावाने सांगितले आहे.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.