मराठा आरक्षणासाठी खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार; शरद पवार, अशोक चव्हाणांची दिल्लीत चर्चा

नवी दिल्ली: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. (ashok chavan meet sharad pawar discussing on Maratha reservation) येत्या […]

मराठा आरक्षणासाठी खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार;  शरद पवार, अशोक चव्हाणांची दिल्लीत चर्चा
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 1:08 PM

नवी दिल्ली: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. (ashok chavan meet sharad pawar discussing on Maratha reservation)

येत्या 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर आदी नेते दिल्लीत आले आहेत. या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने पवारांशी पाऊण तास चर्चा केली. या बैठकीत चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबतची संपूर्ण माहिती दिली. तसेच कायदेशीरबाबींवर चर्चा केली. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नेण्याबाबत चर्चाही केली. हे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यास पवारांनी होकार दिल्याचं चव्हाणांनी सांगितलं.

मेटेंकडे लक्ष देत नाही

चव्हाण मराठा आरक्षणासाठी नव्हेत तर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची मोर्चेबांधणी करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली होती. त्याबाबत चव्हाण यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता मेटेंच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, असं सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

मेटे काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या नावाखाली चव्हाण हे दिल्लीत पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे सातव हे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी चव्हाण दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे ते लॉबिंग करत असल्याचा दावा विनायक मेटे यांन केला होता. चव्हाणांनी काल दिल्लीत मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची बैठक घेतली असं सांगून मराठा समाजाची व राज्याची फसवणूक केली आहे. या बैठकीला अभिषेक मनु सिंघवी वगळता कोणताच वकील उपस्थि नव्हता, असं सांगतानाच चव्हाणांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना का बोलावले नाही? असा सवालही त्यांनी केला. (ashok chavan meet sharad pawar discussing on Maratha reservation)

संबंधित बातम्या:

अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांचेही आदेश पाळत नाहीत; विनायक मेटेंचा आरोप

… तर 50 टक्क्यांमध्ये समावून घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून चव्हाण दिल्लीत; मेटेंचा आरोप

(ashok chavan meet sharad pawar discussing on Maratha reservation)

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.