AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Ramdev Video: अब आगे से पुछेगा तो ठिक नही, पेट्रोल दरवाढीवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच बाबा रामदेव भडकले

गेल्या एका आठवड्यात पेट्रोलचे वाढलेले दर बघितले तर कुणाचेही डोळे पांढरे होतील. आता अशातच योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Baba Ramdev Video: अब आगे से पुछेगा तो ठिक नही, पेट्रोल दरवाढीवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच बाबा रामदेव भडकले
रामदेव बाबा भडकल्याचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: twitter
| Updated on: Mar 31, 2022 | 3:57 PM
Share

नवी दिल्ली : देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel price) दरावरून राजकारणाचा भडका उडाला आहे. तर सर्वसामान्याच्या खिशाला मात्र मोठी कात्री लागत आहे. गेल्या एका आठवड्यात पेट्रोलचे वाढलेले दर बघितले तर कुणाचेही डोळे पांढरे होतील. आता अशातच योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण 2014 पूर्वी महागाई (Inflation) आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून टीका करणारे रामदेव बाबा आत्ताच्या दराबाबत विचारले असता भडकले आहेत. काही जण रामदेव बाबांचा हाच व्हिडिओ ट्विट (Ramकरत आता बाबांना घेरण्याच्या प्रयत्न करत आहेत. सर्वांना योग शिवकवणारे बाबा असे अचानक भडकल्याने या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. अनेकजण हा व्हिडिओ सध्या ट्विट करत आहेत.

रामदेव बाबांचा व्हिडिओ व्हायरल

रामदेव बाबांचा भडका उडाला

या व्हिडिओत रामदेव बाबा म्हणतात, सर्वजण बोलत आहेत महागाई वाढली आहे, तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, मात्र सरकार बोलत आहे तेलाच्या किंमती नाही वाढवल्या तर टॅक्स नाही मिळणार. मग रोड आणि इतर योजना कशा पुऱ्या होणार? मात्र महागाई कमी झाली पाहिजे, महागाई कमी करायची असेल तर आपल्याला जास्त मेहनत करावी लागेल. मी सन्यासी असून पाहटे चार वाजल्यापासून मेहनत करतो. असेच असेल तर मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी. त्यानंतर रामदेव बाबा आधीच्या वक्तव्याबाबत विचारले असता,त्याचे उत्तर टाळताना दिसून आले, तसेच मी माझी मिशी वाढेल असे म्हणालो होतो, असे मिश्किल उत्तर दिली.

बाबांनी प्रश्न विचारणाऱ्यांना डाफरलं

रामदेव बाबा एवढच बोलून थांबले नाहीत तर, तर पत्रकरांना रामदेव बाबा डाफरताना दिसून आले, असे प्रश्न विचारू नका, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही. तेव्हा मीच बोललो होते, आता बोलत नाही, काय करशील? आणि पुन्हा हा प्रश्न विचारशील तर ठिक नाही होणार, असा इशाराच थेट रामदेव बाबांनी प्रश्न विचारणाऱ्याला दिला. त्यामुळे रामदेव बाबांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. इतर वेळी रामदेव बाबांना आपण अत्यंत शांत आणि संयमी रुपात बघतो, मात्र महागाई बाबात विचारले असता, शांत आणि संयमी बाबांचा थेट भडका उडाल्याचे दिसले.

Today’s gold, silver prices : सोन्याच्या दरात किंचित घसरण, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार

Petrol, Diesel Price: इंधन दरवाढ सुरूच; आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.