भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये कोकीन, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, ड्रग्ज बाळगल्याने अटक

कोलकातामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Bengal BJP Youth leader Pamela Goswami handcuffed with drugs).

भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये कोकीन, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, ड्रग्ज बाळगल्याने अटक
पामेला गोस्वामी
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 9:25 PM

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील घडामोडींना वेग आला आहे. भाजपसह सर्वच पक्ष सध्या कामाला लागले आहेत. दरम्यान, कोलकातामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगालमधील भाजपच्या युवा मोर्चाची एक महिला नेता अडचणीत आली आहे. या महिला नेताचे नाव पामेला गोस्वामी असं आहे. पामेला हीने कारमध्ये कोकीन हे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं आहे (Bengal BJP Youth leader Pamela Goswami handcuffed with drugs).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

पामेला गोस्वामी आपल्या कारमधून कोकीन हे ड्रग्ज घेऊन जात होती. पोलिसांना याबाबत खबर मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी कारवाई केली. या कारवाईत गोस्वामी रंगेहाथ पकडली गेली. पोलिसांनी कोलकाताच्या न्यू अलीपूर भागात तिची गाडी अडवली. यावेळी गाडीत तिच्यासोबत एक सुरक्षा रक्षकही होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीत लाखो रुपयांचे ड्रग्ज मिळाले.

पामेलाच्या मित्रालाही अटक

दरम्यान, पामेला गोस्वामीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिचा मित्र प्रबीर कुमार डे यालाही अटक केली. पोलिसांनी प्रबीरला कोलकाताच्या अलिपूर येथील एनआर एनेन्यू या भागातून अटक केली (Bengal BJP Youth leader Pamela Goswami handcuffed with drugs).

पोलिसांना आधीपासूनच पामेलावर होता संशय

ही कारवाई करण्याआधीच पोलिसांना पामेला गोस्वामीवर संशय होता, अशी माहिती समोर येत आहे. पामेला एका विशिष्ट ठिकाणी थांबायची. तिथूनच कोकीनचं देवाणघेवाण केलं जायचं. गेल्या काही दिवसांपासून पोलीस पामेलाच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्यानुसार त्यांना हळूहळू याबाबतची अधिकची माहिती मिळत गेली. अखेर आज पामेला कारमधून ड्रग्ज घेऊन जात असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानंतर पोलिसांनी तिची कार अडवत झडती घेतली. यावेळी पोलिसांना तिच्या बॅगेत आणि कारच्या सीटमध्ये कोकीन मिळालं. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

हेही वाचा : 52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास : सुप्रिया सुळे

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.
कधी कधी मला डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो, फडणवीस असं का म्हणाले?
कधी कधी मला डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो, फडणवीस असं का म्हणाले?.