AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीन्स घालणारे काय राजकारण करणार?, जीन्सवाल्यांना पक्षात नो एन्ट्री; लालूंच्या पक्षात चाललं काय?

लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने अजब विधान केलं आहे. जीन्स पँट घालणाऱ्यांना राजकारण काय कळतं? ते काय राजकारण करणार?; असा सवाल या नेत्याने केला आहे. (RJD state president Jagdanand Singh)

जीन्स घालणारे काय राजकारण करणार?, जीन्सवाल्यांना पक्षात नो एन्ट्री; लालूंच्या पक्षात चाललं काय?
jeans
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 10:24 AM
Share

पाटणा: लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने अजब विधान केलं आहे. जीन्स पँट घालणाऱ्यांना राजकारण काय कळतं? ते काय राजकारण करणार?; असा सवाल या नेत्याने केला आहे. एवढंच नव्हे तर जीन्स घालणाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नसल्याचं धक्कादायक विधानही या नेत्याने केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Bihar Controversial statement of RJD state president Jagdanand Singh says those who wear jeans cannot do politics)

राजदचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. जातीवर आधारित जनगणना सुरू करण्यात या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. यावेळी संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. जीन्स पँट घालणारे राजकारण करू शकत नाही. आमचा पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांचा पक्ष आहे. संघर्ष करणाऱ्यांचा पक्ष आहे. जे लोक जीन्स घालतात ते कधीच नेता बनू शकत नाही, असं जगदानंद सिंह यांनी सांगितलं.

जे लोक निदर्शने करत नाहीत ते संघाचे कार्यकर्ते आहेत. ते आमच्यामध्ये घुसले आहेत, असं सांगतानाच तुम्ही चित्रपटाची शुटींग करण्यासाठी आला आहात का? राजकारण करायला आला आहात तर निदर्शनामध्ये सामील व्हा. आंदोलन करायला शिका. ही तरुण नेत्यांच्या प्रशिक्षणाची वेळ आहे, असं ते म्हणाले.

Jagdanand Singh

जगदानंद सिंह, राजदचे बिहार प्रदेशाध्यक्ष

मोठा संघर्ष करावा लागेल

आपला अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्यासाठी आपल्याला मोठी लढाई लढावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं. जातीवर आधारित जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, बॅकलॉग भरावा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना इन्कम टॅक्स चौकात अडवलं.

सतत फोटो काढत असतात

त्यानंतर जगदानंद यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं. मात्र, पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन करावं यासाठी त्यांना बराच खटाटोप करावा लागला. तुम्ही लोक सतत फोटो काढण्याच्या फंदात अडकलेले असतात. आंदोलनात बसा नाही तर तुम्ही आरजेडीचे कार्यकर्तेच नाही, असं आम्ही समजू, असा दमच त्यांनी या तरुणांना भरला. त्यानंतर हे तरुण कार्यकर्ते आंदोलनात बसले. (Bihar Controversial statement of RJD state president Jagdanand Singh says those who wear jeans cannot do politics)

संबंधित बातम्या:

काँग्रेस नेते राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड होण्यामागे नेमकं कारण काय?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांखाली, अ‍ॅक्टिव्ह केसेसही घटल्या

‘या’ राज्यात इंधनटंचाई; दुचाकीस्वारांना 5 लीटर, कारसाठी फक्त 10 लीटर पेट्रोल मिळणार

(Bihar Controversial statement of RJD state president Jagdanand Singh says those who wear jeans cannot do politics)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.