Bihar Election Results 2025 : महाराष्ट्राचे जावई शिवदीप लांडे बिहार निवडणुकीच्या मैदानात आघाडीवर की पिछाडीवर…
Bihar Election Results 2025 : बिहारच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे... महाराष्ट्राचे जावई शिवदीप लांडे बिहार निवडणुकीच्या मैदानात आघाडीवर की पिछाडीवर.. आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले आहे..

Bihar Election Results 2025 : बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर आज मतमोजणी होऊन निकाल समोर येऊ लागले आहेत. सर्वांचं लक्ष आता निकालाकडे लागलं असून, पुढील मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितेश कुमार यांचीच वर्णी लागणार का? याकडे देखील संपूर्ण बिहारचं लक्ष लागलं आहे. तर मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर विधानसभा मतदारसंघाने यावेळी बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. कारण हा मतदार संघं सध्या हाय – प्रोफाईल म्हणून ओळखला जात आहे… माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे देखील यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत…
शिवदीप लांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, शिवदीप लांडे हे माजी आमदार विजय शिवतारे यांचे जावई आहेत. माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे यांना तितकीशी चांगली कामगिरी करुन दाखवता आलेली नाही. अररियातील हे चित्र आता समोर आलेलं आहे… मराठमोळ्या ‘सिंघम’ अधिकाऱ्यांची बिहारच्या मैदानात दयनीय स्थिती दिसून येत आहे… IPS अधिकारी म्हणून शिवदीप लांडे यांनी चमकदार कामगिरी केली आहे. पण राजकारणात शिवदीप लांडे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. शिवदीप लांडे यांना फक्त 264 व्होट मिळाले आहेत.
‘बिहारचे सिंघम’ नावाने चर्चेत असलेले शिवदीप लांडे पहिल्यांदा राजनितीमध्ये नशिब आजमावत आहेत. पोलिसांची वर्दी सोडून खादीकडे वळलेल्या लांडे यांना जनतेचा किती पाठिंबा आहे हे आजच्या दिवशी निश्चित होईल. त्यांच्या आगमनामुळे या जागेवरील लढाई त्रिकोणी आणि अत्यंत रंजक बनली आहे.
जमालपूर सीटवर बदलेलं समिकरण…
त्रिकोणी लढत असल्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. जेडीयूने येथे मोठी बाजी मारली असून माजी मंत्र्याचं तिकीट कापलं आणि नचिकेता मंडल यांना उमेदवारी दिली. दरम्यान, तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या एका माजी मंत्र्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून स्पर्धा आणखी गुंतागुंतीची केली. अशा परिस्थितीत, काही मिनिटांत येणारे ट्रेंड जेडीयूची पारंपारिक व्होट बँक कोणत्या दिशेने फुटेल आणि कोणत्या बाजूने जाईल हे स्पष्ट करतील.
महाआघाडीच्या वतीने आयआयपी पक्षाचे नरेंद्र तांती हे या जागेवरून उमेदवार आहेत. जे दलित-महादलित व्होट बँक आणि संघटनात्मक ताकदीवर अवलंबून आहेत. तर माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे यांची लोकप्रियता आणि प्रभाव, तर दुसरीकडे जेडीयूचे डावपेच महाआघाडीची ताकद आहे. या तिघांनी मिळून जमालपूरला राज्यातील सर्वात तीव्र लढाईंपैकी एक बनवलं आहे.
