अहमदाबादः गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीतील पीडिता बिल्किस बानो (Bilkis Bano) प्रकरणारणातील ज्या 11 दोषींना सोडण्यात आले, त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शुक्रवारी सुनावणी (hearing) झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणी दाखल झालेल्या सर्व याचिकांवर नोटीस बजावण्यात आली आहे. मागील सुनावणीतही बिल्किस बानोप्रकरणी गुजरात सरकारला नोटीस देण्यात आली होती. ज्या दोषींची सुटका करण्यात आली, त्या सर्व दोषींच्या सुटकेसंबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्याच्या आदेश गुजरात सरकारला देण्यात आल्या आहेत. बिल्किस बानो प्रकरणातील पुढील सुनावणी आता तीन आठवड्यांनी होणार आहे. याप्रकरणी गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले असून दोन आठवड्यात उत्तर देण्याच्या आदेशही देण्यात आले आहेत.