भाजपला सर्वाधिक 800 कोटी रुपयांची देणगी, काँग्रेसला किती?

भारतीय जनता पक्षाला यावर्षी म्हणजेच 2018-19 मध्ये एकूण 800 कोटी रुपयांची देणगी (Bjp get eight hundred crore donation)  मिळालेली आहे. 

भाजपला सर्वाधिक 800 कोटी रुपयांची देणगी, काँग्रेसला किती?

मुंबई : भारतीय जनता पक्षाला यावर्षी म्हणजेच 2018-19 मध्ये एकूण 800 कोटी रुपयांची देणगी (Bjp get eight hundred crore donation)  मिळालेली आहे.  31 ऑक्टोबर रोजी ही माहिती भाजपने निवडणूक आयोगाला दिली. या माहितीनुसार भाजपला यंदा चेक आणि ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून एकूण 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळाली आहे. तर काँग्रेसला फक्त 146 कोटी रुपयांची देणगी (Bjp get eight hundred crore donation) मिळाली आहे.

भाजपला सर्वाधिक देणगी टाटा समूहद्वारे मिळाली असून ती 356 कोटी रुपये इतकी आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या कागदपत्रानुसार भारतातील सर्वाधिक कमाई करणारी संस्था द प्रुडेंट ट्रस्टने भाजपला 67 कोटी रुपयांची देणगी दिली. तर याच संस्थेने काँग्रेसला 39 कोटी रुपयांची देणगी दिली. या ट्रस्टमध्ये भारती ग्रुप, हीरो मोटोकॉर्प, जुबिलियेंट फूडवर्क्स, ओरिएंट सीमेंट, डीएलएफ, जेके टायर्स यासारख्या कंपन्यांनी आपला वाटा दिला आहे.

काँग्रेसला एकूण 146 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यामध्ये  98 कोटी रुपये अशाच ट्रस्टकडून काँग्रेसला मिळाले आहे.

भाजपला एकूण 800 कोटी रुपयांमधील 470 कोटी रुपये विविध संस्थांकडून मिळाले आहेत. आदित्य बिर्ला समुहाकडून भाजपला 28 आणि काँग्रेसला 2 कोटी रुपये देणगी देण्यात आली आहे.

तसेच ट्रिम्प संस्थेने भाजपला 5 कोटी, हार्मोनी ग्रुपने 10 कोटी, जनहित संस्थेने आणि न्यू डेमोक्रेटिक संस्थेने भाजपला प्रत्येकी 2.5 कोटी रुपये देणगी दिली.

दरम्यान, 20हजारपेक्षा अधिक देणगी एखाद्या राजकीय पक्षाला मिळाली तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, भाजपला व्यक्ती, कंपनी आणि निवडणूक संस्थेद्वारेही देणग्या मिळाल्या आहेत.

भापजला ‘या’ कंपन्यांकडूनही कोटींची वर्गणी

हीरो समूहः 12 कोटी
आईटीसीः 23 कोटी
निरमाः 05 कोटी
प्रगती समूहः 3.25 कोटी
मायक्रो लॅब्स : 3 कोटी
बीजी शिरके कनट्रक्शन टेक्नोलॉजी : 15 कोटी
आदी एंटरप्रायजेस : 10 कोटी
लोढा डेवलपर्सः 4 कोटी
मॉडर्न रोड मेकर्सः 15 कोटी
जेवी होल्डिंग्सः 5 कोटी
सोम डिस्टिलरीजः 4.25 कोटी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *