AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिदीची विचारपुस करण्यासाठी भाजप नेते हॉस्पिटलमध्ये, तर TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार, वाचा सविस्तर

ममता बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या ताफ्यात 18 गाड्या आणि एडव्हान्स पायलट कार असताना ममता यांच्यावर हल्ला झालाच कसा | Mamata Banerjee

दिदीची विचारपुस करण्यासाठी भाजप नेते हॉस्पिटलमध्ये, तर TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार, वाचा सविस्तर
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
| Updated on: Mar 11, 2021 | 1:32 PM
Share

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banejree) यांची विचारपूस करण्यासाठी भाजप नेते गुरुवारी कोलकाता येथील SSKM रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याने भाजप नेत्यांना रिकामी हाती परतावे लागले. भाजप नेते तथागत रॉय आणि भाजपचे अन्य काही नेते रुग्णालयात गेले होते. डॉक्टरांनी मनाई केल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अरुप विश्वास यांना भेटून हे नेते परत आले. (Mamata’s tests detected injuries to her ankle, right shoulder, neck, says doctor)

तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत शंका व्यक्त केली आहे. सध्या या हल्ल्याचा तपास सुरु आहे. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अतिरिक्त पोलीस महासंचालक विवेक सहाय आणि ज्ञानवंत सिंह यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु, ममता बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या ताफ्यात 18 गाड्या आणि एडव्हान्स पायलट कार असताना ममता यांच्यावर हल्ला झालाच कसा, असा प्रश्न भाजपच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.

कडेकोट सुरक्षा असताना ममतांवर हल्ला होऊच कसा शकतो?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यात 3 एस्कॉर्ट कार, 2 इंटरसेप्शन कार, महिला पोलिसांची एक गाडी, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षकांच्या तीन गाड्या, टेल कार आणि स्पेअर इंटरसेप्शन कारचा समावेश असतो. चार पायलट कार ताफ्याच्या नेहमी पुढे असतात. यामध्ये डीएसपी आणि सब इन्स्पेक्टर दर्जाचे पोलीस अधिकारी असतात. मग इतक्या कडेकोट सुरक्षेत ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला होऊच कसा शकतो, अशी शंका भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केली आहे.

ममता बॅनर्जींच्या मान आणि पायाच्या हाडाला गंभीर दुखापत; प्रचाराला मुकणार?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी प्रचाराच्या रणांगणातून बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण, नंदीग्राम येथील हल्ल्यात ममता बॅनर्जी यांच्या हाडांना गंभीर इजा झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचा डावा पाय संपूर्णपणे प्लॅस्टरमध्ये आहे. या दुखापतीमुळे ममता बॅनर्जी यांच्यासारखा हुकमी एक्का प्रचारात न उतरल्यास तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यंदाची पश्चिम बंगालची निवडणूक कधी नव्हे ती इतकी अटीतटीची होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा खंदा प्रतिस्पर्धी आणि भाजपच्या आक्रमक प्रचार यंत्रणेला थोपावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करणे तृणमूल काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

मात्र, ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीचे एकूण स्वरुप पाहता त्या राज्यभरात फिरून किती प्रचारसभा घेऊ शकतील, याबाबत शंकाच आहे. गेल्या काही काळात भाजपने सुवेन्दू अधिकारी यांच्यासह तृणमूलचे अनेक प्रमुख नेते गळाला लावले आहेत. हे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्याची गरज आहे. मात्र, सध्याच्या घडीला तरी ही गोष्ट अवघड वाटत आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पायाला दुखापत, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

West Bengal Election 2021 : ‘स्वत:चं नाव विसरु शकते, पण नंदीग्राम नाही, विजय निश्चित’ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ममतांचा दावा

Attack On CM Mamta Banerjee: ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल?

(Mamata’s tests detected injuries to her ankle, right shoulder, neck, says doctor)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.