भाजपचा आणखी एका पक्षाला मोठा धक्का, राज्याच्या राजकारणात खळबळ

भाजपने ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपने मित्रपत्रांना सोबत आणले आहे. ४०० जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपने एकामागे एक अनेक पक्षांना खिंडार पाडले आहे.

भाजपचा आणखी एका पक्षाला मोठा धक्का, राज्याच्या राजकारणात खळबळ
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 5:27 PM

BJP in Jharkhand : देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या आधी सर्वच पक्षाने आपली ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपने यंदा एनडीएसाठी ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे ४०० जागा कशा जिंकता येतील यासाठी भाजरने रणनिती आखली आहे. याच रणनिती भाग म्हणून अनेक छोट्या किंवा प्रादेशिक पक्षांना भाजपने जवळ केले आहे.

बिहारनंतर झारखंडमध्ये राजकीय भूकंप

भाजपने एकट्या ३७० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षांना सोबत घेऊन भाजपला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे. त्यातच भाजपने बिहारनंतर आता झारखंडमध्ये राजकीय भूकंप घडवून आण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मेहुणी सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाला भारतीय जनता पक्षात मोठा झटका दिला आहे. सीता सोरेन यांनी पक्ष सोडल्यानंतर आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जेएमएमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी सीता सोरेनच्या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया देत म्हटले होते की, सीताजींचे अयोध्येत स्वागत आहे.

भाजपकडून निवडणूक लढवणार

सीता सोरेन सध्या दिल्लीत असून त्या दोन दिवसांनी रांचीला परतणार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या दुमका येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. सीता सोरेन यांना हेमंत सोरेन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले. ज्याला सीता सोरेन यांनी कडाडून विरोध केला होता.

सीता सोरेन यांना नंतर चंपाई सोरेन मंत्रिमंडळात पद मिळेल अशी देखील आशा होती, पण तसे देखील झाले नाही. हेमंत सोरेन यांचे धाकटे बंधू आणि दुमकाचे आमदार बसंत सोरेन यांना महत्त्वाचे खाते मिळाले. कल्पना सोरेन यांची जेएमएममधील सक्रियता वाढल्याने सीता सोरेन अस्वस्थ असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं जात आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....