पुस्तकाची किंमत तब्बल 15 कोटी, या बुकफेअरमध्ये जगातले महागडे पुस्तक विक्रीला, काय आहे यात ?
पुस्तकाच्या जगतात एखाद्या पुस्तकाची किंमत किती असेल फार तर लाख रुपये असा तुम्ही विचार करत असाल परंतू एका 15 कोटी रुपयांच्या पुस्तकाने खळबळ उडवली आहे. तुम्हाला वाटेल असे काय आहे या पुस्तकात...

बिहारच्या पाटणा पुस्तक मेळ्यात यावेळी सर्वांची नजर एका पुस्तकाकडे होती. या पुस्तकाने केवळ साहित्यप्रेमीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील आश्चर्याचा धक्का दिला आहे. 41 व्या पाटणा बुक फेअरमध्ये ‘मैं’नावाचे पुस्तक सर्वाधिक चर्चेत आहे. या पुस्तकाची किंमत 15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.संपूर्ण जगात या पुस्तकाच्या केवल तीनच प्रती असल्याचे म्हटले जात आहे.
पाटणा बुक फेअरमध्ये या पुस्तकाला मोठ्या भव्य पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची पाने उलटण्याची परवानगी कोणाला नव्हती. यामुळे लोकांची उत्सुकता आणखीनच चाळवली गेली आहे.
3 तास 24 मिनिटांत पुस्तक लिहीले
या’मैं’ पुस्तकाचे लेखक रत्नेश्वर यांचा दावा आहे की 408 पानांचे हे पुस्तक त्यांनी केवळ 3 तास 24 मिनिटांत लिहिले आहे. त्यांच्या मते 6 आणि 7 सप्टेंबर 2006च्या दरम्यानच्या रात्री ब्रह्ममुहूर्तावर लिहिताना त्यांना आध्यात्मिक जागरण आणि ‘ब्रह्मलोक यात्रा’चा अनुभव झाला. त्याच अनुभवाला त्यांनी शब्दात व्यतित करीत हा ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकात एकूण 43 अध्याय आहेत. आणि लेखकाचे म्हणणे आहे की मानवाच्या मानण्याच्या ते जाणण्याच्या प्रवासाला समजवते.
ज्ञानाची परमावस्था वा प्रसिद्धीची पद्धत ?
लेखक रत्नेश्वर या पुस्तकाला साधारण पुस्तक नव्हे तर ज्ञानाच्या परमावस्थेच्या आविष्कार मानतात. त्यांचे म्हणणे आहे की हा ग्रंथ दु:खाचा अंत, ईश्वर – दर्शन आणि आत्मबोधाच्या मार्गाला समजणारा आहे. लेखकाच्या मते त्यांनी त्यांची आध्यात्मिक यात्रेच्या दरम्यान हे निश्चित केले की या पुस्तकाची किंमत 15 कोटी रुपये असायला हवी.
पुस्तक मेळाव्यात उपस्थित अनेक लोक यास एक पब्लिसिटी स्टंट मानत आहेत. प्रश्न असा आहे की जेव्हा या पुस्तकाला चाळण्याची देखील परवानगी दिली जात नाही तर लोक या कंटेन्टवर भरवसा कसा करणार असा सवाल केला जात आहे.
केवळ 11 लोकांपर्यंत पोहचेल
लेखकाचे म्हणणे आहे की सध्या या पुस्तकाच्या तीन प्रती तयार केल्या आहेत. त्यांची इच्छा केवळ 11 विशेष लोकांना हे पुस्तक सोपवायाचे आहे. ते अशा लोकांच्या शोधात आहेत, ज्यांना हे ज्ञान समजू शकेल. हे पुस्तक हिंदीमध्ये लिहिले असून याची इंग्रजी आवृत्ती देखील लाँच केली आहे. इंग्रजी भाषांतर कनिष्का तिवारी यांनी केले आहे. इंग्रजी आणि हिंदी दोन्ही आवृत्तीची किंमत समान 15 कोटी रुपये ठेवली आहे.
खरंच सर्वात महागडे पुस्तक ?
पाटणा बुक फेअरमध्ये ‘मैं’पुस्तकाला जगात महागडे म्हटले जात असले तर जगात हा रेकॉर्ड अन्य पुस्तकाच्या नावावर आहे. जगातले सर्वात महागडे पुस्तक लियोनार्डो दा विंची यांचे ‘द कोडेक्स ऑफ लीसेस्टर’ आहे.
यास मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सचे 1994 मध्ये 30.8 मिलियन डॉलर खरेदी केले होते. ज्याची सध्याची किंमत 270 कोटी रुपयावरुन जास्त आहे.हे पुस्तक विज्ञानाशी संबंधित एक दुर्लभ जर्नल आहे. ज्यात चंद्र, पाणी आणि जीवाश्मांशी संबंधित महत्वाचे विचार स्वत: दा विंची यांनी मांडले आहेत.
