Army Chopper Crash: तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत चारजण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते.
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूतन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.
Follow us
चेन्नई:तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) कोसळलं. या दुर्घटनेत चारजण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) हे पत्नीसह प्रवास करत होते. या अपघातात तेही जखमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, लष्कराकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.