मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाचे फटके कोण मारतंय? काय आहे हा प्रकार? व्हिडिओ Viral का होतोय?

मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आपल्या हातावर चाबकाचे फटके मारून घेतल्याने त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाचे फटके कोण मारतंय? काय आहे हा प्रकार? व्हिडिओ Viral का होतोय?
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 12:28 PM

रांचीः छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल(Bhupesh Baghel) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत मुख्यमंत्री भूपेश बघेल स्वतःच्या हातावर चापकाचे फटके मारून घेतायत. छत्तीसगडमधील (Chattisgadh) दुर्ग जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे.

आदिवासी बहुल अशा छत्तीसगडमधली ही एक प्रथा आहे. येथील गौरी-गौर पूजेच्या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले. यातील एका प्रथेनुसार, प्रत्येकजण आपल्या हातावर चापकाचे फटकारे मारून घेतात आणि ते सहन करतात.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसतंय, मुख्यमंत्री भूपेश बघेल गर्दीत उभे आहेत. त्यांनी हात पुढे केलाय. एक व्यक्ती त्यांच्या मनगटावर सपासप् चाबकाचे फटके मारतोय. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हात अगदी ताठच ठेवलाय.

पाच फटके मारणाऱ्या व्यक्तीसमोर मुख्यमंत्री बघेल यांनी हातही जोडलेले दिसतायत. मुख्यमंत्री बघेल दरवर्षीच या पूजेला आवर्जून उपस्थित राहतात.

मुख्यमंत्री भूपेश बघेल आज दुर्ग जिल्ह्यातील गौरा गौरी पूजेत सहभागी झाले. या पूजेदरम्यान अशा प्रकारे चाबकाचे फटकारे मारून घेतल्याने अनिष्ट गोष्टी टळतात. राज्यात आनंदीआनंद राहतो, अशी मान्यता आहे.

ही प्रथा पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, परमेश्वर तुमच्या आयुष्यात दरवर्षी आनंद घेऊन येवो. तुमचे आयुष्य असेच उजळून निघत राहो.

भूपेश बघेल म्हणाले, गौरी गौरा पूजेत मी दरवर्षी सहभागी होतो. येथील नगरप्रदक्षिणेतही ते सहभाग नोंदवतात.

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.