AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पाकिस्तानचा खेळ खल्लास! आर्मी चिफची सैनिकांना खुली सुट, हल्ला होताच थेट…

भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची स्थिती असताना भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांत नेमकं काय-काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

आता पाकिस्तानचा खेळ खल्लास! आर्मी चिफची सैनिकांना खुली सुट, हल्ला होताच थेट...
indian army
| Updated on: May 11, 2025 | 8:02 PM
Share

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचं ठरवलं आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची स्थिती असताना भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांत नेमकं काय-काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे आता भारताने आणखी कठोर भूमिका घेतली असून भारतीय आर्मीला प्रत्युत्तर देण्यास खुली सूट देण्यात आली आहे.

समकक्ष अधिकाऱ्यांना दिला संदेश

भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय लष्कराच्या भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिली. “आज मी पाकिस्तानच्या माझ्या समकक्ष अधिकाऱ्याला संदेश दिला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे होत असलेल्या उल्लंघनाबाबत आम्ही त्यांचे लक्ष वेधले आहे. 10 मे रोजी झालेल्या कराराचे उल्लंघन होत असल्याचेही आम्ही त्यांना सांगितले,” अशी माहिती राजीव घई यांनी दिली.

कमांडर्सना पूर्णपणे सूट दिली

तसेच, लष्कराच्या प्रमुखांनी (चिफ ऑफ आर्मी स्टाफ) आज एक आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत सुरक्षेचा आढवा घेण्यात आला. तसेच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे कोणत्याही पद्धतीने उल्लंघन झाल्यास लष्कर प्रमुखांनी कमांडर्सना प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सूट दिलेली आहे, असेही राजीव घई यांनी सांगितले.

…तर चोख प्रत्युत्तर देऊ

दरम्यान, पत्रकार परिषदेच्या शेवटी राजीव घई शेवटी पाकिस्तानसोबतच्या तणावात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रती तसेच शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांचा त्याग हा कायम लक्षात ठेवला जाईल. भारताच्या अखंडतेला, नागरिकांना धोका पोहोचवला जात असेल तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असेही राजीव घई यांनी सांगितले.

Follow Us
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?