AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचे सर्वात मोठे धरण भारतासाठी ‘वॉटर बॉम्ब’ आहे, अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला मोठा धोका

चीनच्या या पाऊला विरोधात आपण काय करु शकतो. यावर मुख्यमंत्री खांडू म्हणाले की सरकार केवळ विरोध नोंदवून शांत बसू शकत नाही. ते म्हणाले चीनला कोण समजावणार ?

चीनचे सर्वात मोठे धरण भारतासाठी 'वॉटर बॉम्ब' आहे, अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला मोठा धोका
| Updated on: Jul 09, 2025 | 7:49 PM
Share

भारत एकीकडे सिंधू करार रद्द केल्याने पाकची कशी जिरवली याचा विचार करीत आहे तिकडे चीनने अरुणाचल राज्याच्या सीमेवर सर्वात मोठे धरण बांधत आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी हे विशाल धरण भारतासाठी ‘वॉटर बॉम्ब’ ठरणार आहे अशी भीती व्यक्त केली आहे. खांडू यांनी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की यारलुंग त्सांगपो नदीवर जगातील सर्वात मोठे धरण हा गंभीर चिंतेचा विषय आहे. कारण चीनने आंतरराष्ट्रीय जल करारावर सही केलेली नाही.त्यामुळे कोणतेही संकेत चीन पाळणार नाही हे उघड आहे. ब्रह्मपुत्र नदीला तिबेटमध्ये यारलुंग सांगपो या नावाने ओळखले जाते.

चीनवर विश्वास ठेवता येणार नाही

सीएम खांडू म्हणाले की,’ मुद्दा हा आहे की चीनवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही. कोणालाच माहीती नाही ते काय करतील.ते पुढे म्हणाले चीनपासून सैन्य धोक्यांशिवाय ही माझ्या मते कोणत्याही अन्य समस्येपेक्षा जास्त मोठी गोष्ट आहे. हा आमच्या जनजाती आणि आमच्या जीवनाच्या अस्तित्वालाच सर्वात मोठा धोका आहे. हा खूपच गंभीर मुद्दा आहे कारण चीन याचा वापर एखाद्या वॉटर बॉम्ब सारखा करु शकतो.’

चीनची महाकाय धरण योजना

यारलुंग त्सांगपो धरणाच्या नावाने ओळखली जाणाऱ्या या धरणाच्या योजनेची घोषणा चीनचे तत्कालीन पंतप्रधान ली ली केकियांग यांनी साल २०२१ मध्ये सीमाक्षेत्राचा दौरा केल्यानंतर केली होती. बातम्यानुसार चीनने १३७ अब्ज अमेरिकन डॉलर खर्चाच्या या योजनेच्या निर्मितीला साल २०२४ मध्ये मंजूरी दिली. या धरणातून 60,000 मेगावॅट वीज निर्मिती होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे जगातील हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे.

भारताला धोका का आहे?

सीएम खांडू यांनी सांगितले की चीनच्या आंतरराष्ट्रीय पाणी वाटप करारावर हस्तांक्षर केले असते तर काही समस्या नव्हती. कारण जलसृष्टीसाठी बेसिनच्या खालच्या हिश्यात एक निश्चित मात्रेत पाणी सोडणे अनिवार्य असते. ते म्हणाले की वास्तविक चीनने जर आंतरराष्ट्रीय जल वाटपा करारावर हस्ताक्षर केले असते तर हीच योजना भारतासाठी वरदान सिद्ध झाली असती. याने अरुणाचल प्रदेश, आसम आणि बांग्लादेशात जेथे ब्रह्मपुत्र नदी वाहते. मान्सूनच्या दरम्यान येणाऱ्या पुराला रोखता आले असते. खांडू म्हणाले की, परंतू चीनने हस्तांक्षर केले नाही हीच समस्या आहे. समजा धरण बांधून पूर्ण झाले आणि त्यांनी अचानक पाणी सोडले तर आमचे संपूर्ण सियांग क्षेत्र नष्ट होऊन जाईल. खास करुन आदीम जनजाती आणि त्यांच्यासारखे समुह त्यांची सर्व संपत्ती, जमीनी तर नष्ट होतीलच शिवाय मानवी जीवनाला विनाशकारी समस्यांचा सामना करावा लागेल. ‘

चीन कोणतीही माहीती शेअर करत नाही..

मुख्यमंत्री म्हणाले की, म्हणूनच अरुणाचल प्रदेश सरकारने भारत सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर, सियांग अप्पर मल्टीपर्पज प्रोजेक्ट नावाचा प्रकल्प आखला आहे, जो संरक्षण यंत्रणा म्हणून काम करेल आणि जल सुरक्षा सुनिश्चित करेल. ते म्हणाले, “मला वाटते की चीनने एकतर त्याच्या बाजूने काम सुरू करणार आहे किंवा आधीच सुरू केले आहे. परंतु ते कोणतीही माहिती शेअर करत नाहीत. जर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले तर भविष्यात आपल्या सियांग आणि ब्रह्मपुत्र नद्यांमधील पाण्याच्या प्रवाहात लक्षणीय घट होऊ शकते.”

भारताचा काऊंटर प्लान काय ?

भारताच्या जल सुरक्षेसाठी जर सरकारची स्वत:ची योजना योजने बरहुकूम तयार झाली तर आपण आपल्या धरणातून पाण्याची गरज पूर्ण करु शकू. भविष्यात जर चीनने पाणी सोडले तर पूर निश्चितच येईल.परंतू त्याला नियंत्रित करता येईल. याच साठी खांडू म्हणाले की राज्य सरकार स्थानिय जनजाती आणि या परिसरातील लोकांशी बोलत आहे. या मुद्यावर जागरुकता वाढण्यासाठी आपण एका बैठकीचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

चीनच्या या पाऊला विरोधात आपण काय करु शकतो. यावर मुख्यमंत्री खांडू म्हणाले की सरकार केवळ विरोध नोंदवून शांत बसू शकत नाही. ते म्हणाले चीनला कोण समजावणार ? चीनला आपण आपले कारण सांगू शकत नाही. त्यापेक्षा आपण आपली तयारी केली पाहीजे. चीनचे धरण हिमालय पर्वतरांगांच्या विशाल खंडावर तयार होत आहे. जेथून नदी अरुणाचल प्रदेशात प्रवाहीत होण्यासाठी युटर्न घेते..

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.