AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीडीपीसोबत सत्ता का उपभोगली? दाऊदची बायको मुंबईत कशी आली? शाहांच्या ‘गुपकार गँग’ आरोपानंतर काँग्रेसचे सवाल

काँग्रेस ही जम्मू-काश्मीरमधील 'गुपकार ग्रुप'चा भाग नाही, असं रणदीप सुरजेवाला यांनी ठणकावून सांगितलं.

पीडीपीसोबत सत्ता का उपभोगली? दाऊदची बायको मुंबईत कशी आली? शाहांच्या 'गुपकार गँग' आरोपानंतर काँग्रेसचे सवाल
| Updated on: Nov 17, 2020 | 5:56 PM
Share

नवी दिल्ली : ज्या गुपकार ग्रुपची ‘गुपकार गँग’ (Gupkar Gang) अशी संभावना करता, त्यातील पीडीपी (PDP) च्या साथीने जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सरकार स्थापन का केलं होतं? दाऊदची बायको 2016 मध्ये उघडपणे मुंबईत येऊन पाकिस्तानला कशी परतली? असे सवाल विचारत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी काँग्रेस ही जम्मू-काश्मीरमधील ‘गुपकार ग्रुप’चा भाग नाही, असं ठणकावून सांगितलं. (Congress is not a part of Gupkar Alliance or People’s Association for Gupkar Declaration says Randeep Surjewala)

“दर दिवशी खोटं बोलून भ्रम निर्माण करणे, हा मोदी सरकारचा डाव, चेहरा आणि चारित्र्य झाले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय सुरक्षेच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत जम्मू काश्मीर आणि लडाखबाबत खोटे आणि खोडसर वक्तव्य करत आहेत” अशी टीका सुरजेवालांनी केली.

सुरजेवाला यांचे चार सवाल

“अमित शाह यांनी एक गोष्ट सांगावी, ज्या पीडीपीवर ते टीका करत आहेत, त्यांच्या साथीने भाजपने जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन का केलं होतं?” असा सवाल सुरजेवाला यांनी विचारला आहे.

भाजप सरकारने जम्मू काश्मीरच्या तुरुंगातून कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख यांची अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सुटका का केली होती? हेच उग्रवादी 26/11 च्या मुंबई हल्ल्याला जबाबदार नव्हते का? असा सवालही काँग्रेसने विचारला आहे.

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमची बायको 2016 मध्ये उघडपणे मुंबईत जाऊन पाकिस्तानला परतली कशी? तिला कोणी परवानगी दिली होती? हे अमित शाह यांनी सांगावं, असंही सुरजेवाला यांनी विचारलं आहे.

दाऊद इब्राहिमसोबत फोनवरुन कथित बातचित झाल्याच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या एका मंत्र्याला पदावरुन का हटवलं? जर यात तथ्य होतं, तर तक्रार का दाखल केली नाही? हे प्रकरण मिटवून का टाकण्यात आलं? असा सवालही सुरजेवाला यांनी विचारला आहे.

“भारतीय भूभागावरुन चीनला परतवून लावणे किंवा पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणे, अशा जबाबदाऱ्या सोडून अमित शाह आणि मोदी सरकारमधील मंत्री दररोज तथ्यहीन वक्तव्यं करत आहेत. काँग्रेस पक्ष शाह आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांची कडक शब्दात निंदा करतो” असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.

(Congress is not a part of Gupkar Alliance or People’s Association for Gupkar Declaration says Randeep Surjewala)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील ‘गुपकार ग्रुप’ची ‘गुपकार गँग’ अशी संभावना केली आहे. ”या गुपकार गँगला जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं या गुपकार गँगला समर्थन आहे का?” असा सवाल अमित शाह यांनी केला होता.

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याच्या मागणीसह गुपकार ग्रुपची घोषणा करण्यासाठी श्रीनगरमध्ये ‘पीपल्स अलायन्स’ची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांना पीपल्स अलायन्सचे अध्यक्ष, तर पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.

“जुन्या सवयी जात नाहीत. लव्ह जिहाद, तुकडे तुकडे आणि आता गुपकार गँग. वाढती बेरोजगारी आणि महागाई सारख्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी राजकीय टीका करण्यात हे धन्यता मानतात” अशी टिपण्णी पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी अमित शाहांच्या टीकेवर केली.

संबंधित बातम्या :

गुपकार गँग’ला काश्मीरमध्ये परदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवाय; सोनिया-राहुल गांधींना हे मान्य आहे का?: अमित शाह

गुपकार घोषणा: “आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही”, पीपल्स अलायन्सच्या बैठकीत फारुक अब्दुल्ला गरजले

(Congress is not a part of Gupkar Alliance or People’s Association for Gupkar Declaration says Randeep Surjewala)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.