नवी दिल्ली : शिवसेनेने आपलं मुखपत्र ‘सामना’ संपादकीयमधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात हात घालून सत्ताधारी भाजपचा सामना करण्याचा सल्ला दिला. याला काँग्रेस वर्किंग कमिटीचे (Congress Working Committee-CWC) सदस्य दिनेश गुंडू राव यांनी शुक्रवारी (25 जून) पाठिंबा दिला. शिवसेनेने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि शरद पवार (Sharad Pawar) सोबत आल्यास विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपचा सामना करता येईल, असं म्हटलंय (Congress leader Dinesh Gundu Rao support Rahul Gandhi Sharad Pawar together).