धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

माणिकराव ठाकरे यांना धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांसदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा माणिकराव ठाकरे यांनी अगदी मोजक्या शब्दांत याप्रकरणावर भाष्य केले. | Manikrao Thackeray

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:48 PM, 13 Jan 2021
Congress leader Manikrao Thackeray son Dhananjay Munde rape accusations

नवी दिल्ली: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांवर काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. धनंजय मुंडे यांनी सर्व खुलासे केले आहेत. त्यामुळे आता इतरांनी त्यावर बोलणे योग्य नाही, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. (Congress party first comment on Dhananjay Munde rape accusations)

ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांसदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा माणिकराव ठाकरे यांनी अगदी मोजक्या शब्दांत याप्रकरणावर भाष्य केले.

‘महाराष्ट्रात नवा अध्यक्ष लवकरच निवडला जाईल’

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच नव्या अध्यक्षाची निवड होईल, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या रेसमध्ये नाही. मी प्रदेशाध्यक्षपद मागणे सयुक्तिक नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका

कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी पुरुषांच्या संपर्कात राहावे लागते, या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या वक्तव्यावर माणिकराव ठाकरे यांनी टीका केली. हा प्रकार योग्य नाही, किमान आमचा तरी तसा अनुभव नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षांना तसा अनुभव आला असेल तर त्यांनी खुलासा करावा, असे माणिकराव ठाकरे यांनी म्हटले.

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दत्तामामा म्हणाले ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे आहे. मी छोटा माणूस आहे. धनंजय मुंडे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यावर मी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही.

हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. इतिहासात असे अनेक दाखले सापडतील, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. या प्रकरणाची सतत्या पडतळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे भरणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट, रेखा शर्मांच्या विधानाने खळबळ

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दत्तामामा म्हणाले ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल

बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?

….. तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत 

(Congress party first comment on Dhananjay Munde rape accusations)