राहुल गांधीच्या नेतृत्वावर सहमती, मग चिंतन शिबिराची गरज काय ? नेत्यांची नाराजी दूर होणार?

काँग्रेस चिंतन शिबिराच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार, बजबुती यावर चर्चा करणार आहे. (Congress Chintan shibir Pachmarhi)

राहुल गांधीच्या नेतृत्वावर सहमती, मग चिंतन शिबिराची गरज काय ? नेत्यांची नाराजी दूर होणार?
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 7:53 PM

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (19 डिसेंबर) काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावावर संमती झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता चिंतन शिबिराच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार, बजबुती यावर चर्चा करण्यात येणार आहे. हे शिबीर पंचमढी आणि शिमला येथे आयोजित केले जाईल. (Congress will hold Chintan shibir at Pachmarhi and Shimla)

सोनिया गांधी याच्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी नाराज नेते, अन्य ज्येष्ठ नेते, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, तसेच, आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक लगातार चार तास चालली. या बैठकित पक्षातील संघटनात्मक बदल तसेच, काँग्रेस पक्षाला मजबूत कसं करता येईल यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवनकुमार बंसल यांनी सांगितले.

लवकरच चिंतन शिबीर

ही बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लवकरच काँग्रेस पक्षाकडून चिंतन शिबिराचे आयोजन केले जाईल. हे शिबीर पंचमढी आणि शिमला येथे आयोजित केले जाईल, अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षातील अंतर्गत निवडणुकांचे काम प्रगतिपथावर

यावेळी बोलताना बंसल यांनी काँग्रेसमध्ये होणाऱ्या अंतर्गत निवडणुकीबद्दल माहिती दिली. “काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडीसाठी लवकरच निवडणुका होतील. ही सर्व प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. केंद्रीय निवडणूक प्राधिकरण या सर्व गोष्टींवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वार कुठल्याही नेत्याने विरोध दर्शविला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

चिंतन शिबिराची गरज काय ? नेत्यांची नाराजी दूर होणार?

काँग्रेसमध्य़े संघटनात्मक पातळीवर बदल व्हावेत या मागणीला घेऊन पक्षातील मोठी फळी सध्या नाराज आहे. त्यांच्या नाराजी दूर व्हावी तसेच त्यांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी (19 डिसेंबर) बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काही दिवसांत चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठरले आहे. या शिबिरात वेगवेगळ्या प्रश्नांवर चिंतन केले जाणार आहे. मात्र, या चिंतन शिबिरामुळे नेमके काय साध्य होणार? यामुळे नाराज झालेल्या नेत्यांची नाराजी दूर होणार का?, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

संबंधित बातम्या :

काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते ‘स्पेशल 23’ इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?

पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; सोनिया गांधींना ‘या’ नेत्याने दिला सल्ला

सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र, पण काय आहे त्यात? वाचा महाराष्ट्र प्रभारी काय सांगतायत?

(Congress will hold Chintan shibir at Pachmarhi and Shimla)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.