AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादग्रस्त स्वयंघोषीत स्वामी नित्यानंद यांचा मृत्यू ? जगभरातील भक्तांमध्ये खळबळ,1000 कोटींच्या संपत्तीचा वारस कोण?

२०१० मध्ये स्थानिक वृत्तवाहिन्यांवर स्वामी नित्यानंद यांचा एका तमिळ अभिनेत्रीसोबतचा लैंगिक संबंध ठेवताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वादग्रस्त स्वयंघोषीत स्वामी नित्यानंद यांचा मृत्यू ? जगभरातील भक्तांमध्ये खळबळ,1000 कोटींच्या संपत्तीचा वारस कोण?
| Updated on: Apr 01, 2025 | 8:29 PM
Share

वादग्रस्त स्वामी नित्यानंद महाराज यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. नित्यानंद यांचे पुतणे श्री नित्या सुंदरेश्वरानंद यांनी या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही परवा ही घोषणा केली. स्वामी  नित्यानंद महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे असे त्यांच्या पुतण्याने जाहीर केले आहे.  त्यामुळे स्वामी नित्यानंद महाराजांच्या भक्तांना धक्का बसला आहे. जर नित्यानंद यांचा खरोखरच मृत्यू झाला असेल, तर त्याच्या १०,००० कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण ? आता अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. नित्यानंद यांच्या संपत्तीवर अभिनेत्री रंजीता दावा करू शकते की दुसरे कोणी पुढे येईल याविषयी चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्यापही स्वामी नित्यानंद यांच्या मृत्यू संदर्भात अधिकृत माहीती मिळालेली नाही.

कोण आहेत नित्यानंद स्वामी ?

नित्यानंद स्वामी यांचा १ जानेवारी १९७८ रोजी ( ४७ वय ) तामिळनाडू येथील तिरुवन्नमलई येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव अरुणाचलम आणि आई लोकनायकी आहे. आपल्याकडे दैवी शक्ती आहे असा दावा करणारे आणि मोठ्या संख्येने अनुयायांना आकर्षित करणारे आध्यात्मिक गुरु म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक आश्रम स्थापन केले आहे.त्यांनी स्वतःच्या भक्तांना ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रवचन सुरु केली. परंतू बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला.त्यांच्या विरोधात अनेक कायदेशीर खटले दाखल झाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये तपास यंत्रणांना गुंगारा देऊन भारतातून पळ काढला.

नित्यानंद यांचा खरेच मृत्यू झाला ? की एप्रिल फूल

नित्यानंद यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओनुसार, नित्यानंद यांनी त्यांना १२ वर्षांच्या वयात ‘ज्ञान’ प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. हिंदू धर्माचे आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची ४७ देशांमध्ये अध्यात्मिक केंद्रे चालविली जातात.स्वामी नित्यानंद ‘नित्यानंद ध्यानपीठम’ या त्यांनी स्थापन केलेल्या धार्मिक संघटनेचेही प्रमुख आहेत.

‘कैलासा’ वाद

अटकेच्या भीतीने भारतातून पसार झाल्यानंतर, नित्यानंद यांनी एका दुर्गम बेटावर ‘कैलासा’ नावाचे स्वयंघोषित राष्ट्र स्थापन केले आणि ते एक सार्वभौम हिंदू राष्ट्र असल्याचा दावा त्यांनी केला होता. भारताने इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीस जारी करूनही, ते काही पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत.

वाद आणि नित्यानंद

नित्यानंद वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१० मध्ये स्थानिक वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो एका तमिळ अभिनेत्रीसोबत त्यांचा लैंगिक संबंध ठेवताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यावेळी त्यानी स्वतःचा बचाव करताना सांगितले होते की ते फक्त “शवासन” करीत होते आणि आणि आपण नपुंसक असल्याचा दावाही त्यांनी केला होता,

यानंतर बेंगळुरूमध्ये स्वामी नित्यानंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. २१ एप्रिल २०१० रोजी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.मात्र, लवकरच त्यांची जामिनावर सुटका झाली. दोन वर्षांनंतर, २०१२ मध्ये, अमेरिकेतील एका महिलेने त्याच्यावर पाच वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला, ज्यामुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा आणखी खराब झाली.

अहमदाबादाच्या आश्रमात अपहरण आणि कोंडून ठेवले

नित्यानंद आणि त्याच्या दोन अनुयायांविरुद्ध अहमदाबाद येथील एका आश्रमात दोन अल्पवयीन मुले आणि एका १९ वर्षीय महिलेचे अपहरण करणे आणि कोंडून ठेवणे तसेच त्यांचा छळ केल्याच्या आरोपावरुन २०१९ मध्ये एफआयआर दाखल झाला होता. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने पीडितांच्या वडिलांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर नित्यानंद आणि राज्य सरकार दोघांनाही नोटीस बजावल्या. त्यानंतर, पोलिसांनी आश्रमाच्या दोन व्यवस्थापकांना अटक केली आणि आश्रमातून दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली होती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.