महाराष्ट्र-केरळमध्ये कोरोना वाढला, युपी सरकार अलर्टवर, विमानाने येणाऱ्या प्रवाशांना चाचणी अनिवार्य

देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला पाहता केंद्राने निर्णय आणखी (Corona Test Is Compulsory On UP Airport For Maharashtra And Kerala Travellers) कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र-केरळमध्ये कोरोना वाढला, युपी सरकार अलर्टवर, विमानाने येणाऱ्या प्रवाशांना चाचणी अनिवार्य
कोरोनाची चाचणी नेमकी कधी करावी? कोणती चाचणी जास्त प्रभावी?

नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला पाहता केंद्राने निर्णय आणखी (Corona Test Is Compulsory On UP Airport For Maharashtra And Kerala Travellers) कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्वा राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना विषाणूबाबतच्या गाईडलाईन्स येत्या 31 मार्चपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पत्रात लिहिलं की कोव्हिड-19 विरोधातील लढ्याला पूर्णपणे जिंकण्यासाठी खबरदारी घेणे आणि नजर ठेवणे गरजेचं आहे (Corona Test Is Compulsory On UP Airport For Maharashtra And Kerala Travellers)

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातही महाराष्ट्र आणि केरळात जास्त रुग्ण आहेत. ते पाहाता उत्तर प्रदेश सरकार (Corona Cases) आता पूर्णपणे अलर्टवर आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि केरळातून जो कोणी प्रवासी विमानाने उत्तर प्रदेशात येईल त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी विमानतळावर अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. या प्रकरणात युपी सरकारने शुक्रवारी हे आदेश जारी केलेत. महाराष्ट्र आणि केरळात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे युपी सरकारची चिंता वाढली आहे.

महाराष्ट्र आणि केरळातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना टेस्ट

महाराष्ट्र आणि केरळातून (Maharashtra, Kerala) येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीबाबत अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसादने एक आदेश जारी केला आहे. दोन्ही राज्यांमधून युपीला येणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन टेस्ट विमानतळावरच (Airport) केली जावी. यादरम्यान, जो कोणी पॉझिटीव्ह येईल त्यांना आयसोलेशलमध्ये (Home Isolation) राहावं लागेल. त्यांच्या नमुण्यांना आरटी-पीसीआर टेस्टसाठी पाठवलं जाईल. जे लोक आरटी-पीसीआर टेस्टमध्ये निगेटीव येतील त्यांना आठवड्याभरासाठी क्वॉरंटाईन राहावं लागेल, असं या आदेशात सांगितलं आहे.

महाराष्ट्र-केरळातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर

जे लोक ट्रेन आणि बसेसने महाराष्ट्र आणि केरळातून युपी पोहोचतील त्यांच्यावरही नजर ठेवली जाईल. तसेच, टेस्टही केल्या जातील. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथने चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यावर जोर दिलाय. उन्होंने कहा था कि कोरोना संक्रमण का चक्र तोड़ने के लिए टेस्ट बहुत ही जरूरी हैं. इसके साथ ही उन्होंने इस बात पर भी जोर दिया था कि राज्य में हर दिन करीब 1.25 लाख से कम टेस्ट न किए जाएं (Corona Test Is Compulsory On UP Airport For Maharashtra And Kerala Travellers).

महाराष्ट्र-केरळात कोरोनाचे रुग्ण वाढतेच

केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शुक्रवारी महाराष्ट्राच कोरोनाचे 8,333 नवे रुग्ण आढळून आलेय. तर मुंबईत 1 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्यभरात संसर्गामुळे 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर केरळात एका दिवसात 3,671 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Corona Test Is Compulsory On UP Airport For Maharashtra And Kerala Travellers

संबंधित बातम्या :

देगाव शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गानं प्रशासन सतर्क, आतापर्यंत 3 वेळा आरोग्य तपासणी

मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या मास्क डोळ्यावर लावून झोपला, महाराष्ट्राचे मंत्री म्हणाले, कोरोनाची काय चूक?

अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना, पाच दिवसात 32 जणांचा मृत्यू

Published On - 9:56 am, Sat, 27 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI