मुंबई : गेल्या 24 तासात देशात 17 हजारांहून अधिक नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशामधून येणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे. सातत्याने कोरोना रूग्णांमध्ये (Patient) वाढ होताना दिसते आहे. मागील काही महिन्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्या कमी झाली होती. मात्र, परत एकदा संपूर्ण देशामध्ये कोरोनाने पाय पसरवण्यास सुरूवात केलीयं. देशात नवीन कोरोना रुग्णसंख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. देशात सध्या कोरोनाचे 1 लाख 09 हजार 568 सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे कोरोनाचा खतरा वाढताना दिसतो आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क (Mask) लावणे आवश्यक आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17 हजार 92 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत अधिक आहेत. केरळमध्ये 3,904 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीयं. महाराष्ट्रात 3,249, तामिळनाडूमध्ये 2,385, पश्चिम बंगाल 1,739 आणि कर्नाटकमध्ये 1,073 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालीयं. यामुळे देशाच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये मोठी वाढ पाहयला मिळते आहे. नवीन केसपैकी 22.84 टक्के रूग्ण फक्त केरळमध्ये आहेत.
गेल्या 24 तासात 29 कोरोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक 5.25, 168 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताचा रिकव्हरी दर आता 98.54 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण 14 हजार 684 रुग्ण बरे झाले असून, त्यामुळे देशभरात बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 28 लाख 51 हजार 590 झाली आहे. देशात सध्या कोरोनाचे 1 लाख 09 हजार 568 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये 2 हजार 379 ची वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे एकूण 9 लाख 9 हजार 776 डोस देण्यात आले आहेत. तसेच गेल्या 24 तासांत एकूण 4 लाख 12 हजार 570 नमुने तपासण्यात आले आहेत. देशातून येणारी कोरोनाची आकडेवारी धक्कादायक असून पुढील काही दिवस कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जातंय. यामुळे आता नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यक्ता आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरायला हवा. कोरोनाचे कोणतेही लक्षणे असल्यास लगेचच डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.