कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जावं लागणार, कुणाला वर्क फ्रॉम होम? जाणून घ्या नियमावली

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी

Updated on: Jun 15, 2021 | 10:28 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत सामान्य होत नाही तोपर्यंत कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेनं येण्यास मनाई करण्यात आलीय. पुढे पूर्णपणे अनलॉक झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे निर्देश जारी करण्यात येणार आहेत.

कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जावं लागणार, कुणाला वर्क फ्रॉम होम? जाणून घ्या नियमावली

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जाण्यासाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आलाय. त्यांच्या हजेरीमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अॅन्ड ट्रेनिंगने निर्देश जारी केले आहेत. हे निर्देश अंडर सेक्रेटरी आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या आदेशात 16 जून ते 30 जूनपर्यंत प्रत्येक दिवशी कार्यालयात यावं लागेल. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार अंडर सेक्रेटरी स्तरापेक्षा खालील 50 टक्के कर्मचारी घरातूनच काम करतील. (New rules regarding work from home for government office workers)

कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत सामान्य होत नाही तोपर्यंत कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेनं येण्यास मनाई करण्यात आलीय. पुढे पूर्णपणे अनलॉक झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे निर्देश जारी करण्यात येणार आहेत. सरकारी आदेशानुसार दिव्यांग कर्मचारी आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे बंधनकारक नाही. या कार्यालयातील कर्मचारी घरातूनच काम करतील.

फ्लेक्सी अटेंडन्सचा नियम

मागील महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं होतं की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फ्लेक्सी अटेंडन्स सिस्टिम पुढे वाढवण्यात आलीय. ही नियमावली 15 जूनपर्यंत लागू राहणार आहे. आता 16 जून ते 30 जूनपर्यंत अंडर सेक्रेटरी आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या नियमावलीनुसार 50 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थिती लावणे गरजेचं आहे.

वर्क फ्रॉम होम करताना ब्रेक गरजेचा

तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर तुम्हाला अधून मधून ब्रेक घेणं गरजेचं आहे. ब्रेक घेतेवेळी स्क्रीन टाईमला काही क्विक स्ट्रेचमध्ये बदला. हे बुद्धी आणि शरिर दोन्हीसाठी फायदेशीर असते. एकाच स्थिती अधिक वेळ बसून शरीरात आलेली उदासिनता हटवण्यासही याची मदत होईल. नेक रोल, साईड स्ट्रेच, बॅक आणि अप्पर बॅक स्ट्रेच, सिटेड हिप स्ट्रेच, स्पाईन ट्विस्ट अशा प्रकारचे व्यायाम तुम्ही आपल्या डेस्कवरही करू शकता.

डोळ्यांनाही हवा आराम

आपल्या शरीराच्या इतर अवयवांबरोबरच डोळ्यांनाही आरामाची गरज असते. यासाठी प्रत्येक 20 मिनिटानंतर स्क्रिनपासून दूर पाहण्याचा प्रयत्न करा. 20 सेकंदासाठी 20 फूट दूरवरच्या कोणत्याही वस्तूवर लक्ष केंद्रीत करा. यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होईल.

इतर बातम्या :

महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश?

IRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार !

New rules regarding work from home for government office workers

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI