AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या चौथ्या आमदाराचं कोरोनाने निधन, एकाच राज्यात चार आमदारांनी जीव गमावला!

BJP MLA dies due to covid उत्तर प्रदेशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं (UP corona death) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत तब्बल चार आमदारांचा कोरोनाने (MLA dies due to corona) मृत्यू झाला आहे.

भाजपच्या चौथ्या आमदाराचं कोरोनाने निधन, एकाच राज्यात चार आमदारांनी जीव गमावला!
Dal Bahadur Kori death
| Updated on: May 07, 2021 | 10:46 AM
Share

लखनऊ : देशभर उद्रेक घालणाऱ्या कोरोना व्हायरसने उत्तर प्रदेशात उच्छाद (Uttar Pradesh Corona update) मांडल्याचं चित्र आहे. कारण उत्तर प्रदेशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं (UP corona death) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत तब्बल चार आमदारांचा कोरोनाने (MLA dies due to corona) मृत्यू झाला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार दाल बहादूर कोरी (Dal Bahadur Kori) यांचं कोव्हिड 19 ने निधन झालं आहे. (Dal Bahadur Kori BJPs UP MLA from Salon dies of COVID-19.)

दाल बहादूर कोरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना एक आठवड्यापूर्वी लखनऊमधील (Lucknow) अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरोनानं भाजपच्या चार आमदारांचं निधन

कोरोनामुळे यूपीत मृत्यू झालेल्या आमदारांची संख्या चारवर पोहोचली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांचं निधन झालं आहे. यापूर्वी आमदार केशर सिंह गंगवार (Kesar Singh), औरेयाचे भाजप आमदार रमेश दिवाकर (Ramesh Chandra Diwakar) आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव (Suresh Srivastava ) यांचा समावेश आहे. यानंतर आज आमदार दाल बहादूर कोरी यांचीही प्राणज्योत मालवली.

मंत्री स्मृती इराणी यांचं ट्विट

देशात कोरोनाचा उद्रेक 

देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट (Corona Cases in India) होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती.

संबंधित बातम्या 

कोरोनाचं तांडव सुरुच, भाजपच्या तिसऱ्या आमदाराचं निधन

Corona Cases in India | सलग दुसऱ्या दिवशी 4.1 लाखांहून अधिक नवे रुग्ण, 24 तासात 3915 कोरोनाबळी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.