AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhath Puja 2021: दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा करायला परवानगी

दिल्लीमध्ये यंदा छठ पूजेचा सण साजरा करता येणार आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी बुधवारी जाहीर केले की शहरात छठ पूजेला परवानगी दिली जाईल. 30 सप्टेंबरला छठ पूजेला परवानगी नाकारली होती.

Chhath Puja 2021: दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा करायला परवानगी
Chhath puja
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 6:33 PM
Share

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये यंदा छठ पूजेचा सण साजरा करता येणार आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी बुधवारी जाहीर केले की शहरात छठ पूजेला परवानगी दिली जाईल. 30 सप्टेंबरला छठ पूजेला परवानगी नाकारली होती पण, भाजपच्या नेत्यांनी (BJP Manoj Tiwari) याला विरोध केला. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि ही पूजा चार दिवस चालते. (Delhi allows chhath puja celebration)दिल्लीमध्ये यंदा छठ पूजेचा सण साजरा करता येणार आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी बुधवारी जाहीर केले की शहरात छठ पूजेला परवानगी दिली जाईल.

कडक कोविड प्रोटोकॉल

छठ पूजेला आजच्या DDMA (दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) च्या बैठकीत दिल्लीत छठ पूजेला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लोकांना कडक कोविड प्रोटोकॉल पाळावे लागणार आहे आणि मर्यादित लोकांनाच परवानगी दिली जाईल. लोकांना मास्क इत्यादी अटींचे पालन करावे लागेल. सरकारने अगोदर ठरवलेल्या ठिकाणी अत्यंत कडक प्रोटोकॉलसह पूजा करता येईल, सिसोदिया म्हणाले.

DDMA ने 30 सप्टेंबर रोजी कोरोना महामारीच्या पार्श्वभूीवर मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा साजरी करण्यास मनाई केली होती. पण, भाजपाचे खासदार मनोज तिवारीसह भाजप पक्षाच्या इतर नेत्यांनी याचा विरोध केला होता. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारवर हल्ला चढवला. दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यासाठी DDMA कडे प्रस्ताव पाठवण्यास तिवारी आणि इतर नेत्यांनी सांगितल होते.

फटाक्यांवर बंदी

यावेळी छठपूजेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे जी चार दिवस चालते. ही पूजा पूर्वनिश्चित ठिकाणीच होणार आहे. दिवाळीच्या सहा दिवसांनी छठपूजा सुरू होते.  यंदाही दिल्लीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश देतांना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले होते की, गेल्या तिन वर्षांपासून दिवाळीदरम्यान दिल्लीतील प्रदूषणाची धोकादायक स्थिती आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच सर्व प्रकारच्या फटाक्यांची साठवणूक, विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी घालण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की, मागच्या वर्षी उशिरा संपूर्ण बंदी लागू करण्यात आली होती, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. सर्व व्यापाऱ्यांना आणि जनतेली आवाहन केले की, यावेळी संपूर्ण बंदी लक्षात घेता कोणत्याही प्रकारचे फटाके साठवू नका.

इतर बातम्या

T20 Ranking: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा विराटला रँकिगमध्येही फटका, पाकिस्तानच्या रिजवानने टाकलं मागे

Capt Amrinder Singh New Party: नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार

22 वर्षांनंतर ठाकरेंचं पुन्हा ‘सीमोल्लंघन’, बाळासाहेबांनंतर नातू आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत

Delhi allows chhath puja celebration

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.