AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Bandh मध्ये जेवढं नुकसान झालं तेवढ्या पैशात दिल्लीत सगळ्या नागरिकांचं दोनदा लसीकरण झालं असतं

हा आर्थिक फटका इतका मोठा होता की यामध्ये कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात दिल्लीत सगळ्यांना मोफत लस वाटता आली असती.

Bharat Bandh मध्ये जेवढं नुकसान झालं तेवढ्या पैशात दिल्लीत सगळ्या नागरिकांचं दोनदा लसीकरण झालं असतं
| Edited By: | Updated on: Dec 09, 2020 | 7:36 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. याच पार्श्वभूमिवर मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदला पाठिंबा देण्यासाठी देशभरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. हा आर्थिक फटका इतका मोठा होता की यामध्ये कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात दिल्लीत सगळ्यांना मोफत लस वाटता आली असती. (delhi loss due to bharat bandh on 8 december)

खरंतर, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण कालच्या बंदमुळे कुठे आणि काय परिणाम झाला यावर काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी बंद पुकारला असला तरी बऱ्याच ठिकाणी आपत्कालीन सेवेसाठी मार्ग करून देण्यात आला. पण अनेक ठिकाणी भारत बंदमुळे रुग्णांचं मोठं नुकसान झालं आहे.

भारत बंदमुळे अनेक बाजार समित्या, व्यवहार, वाहतूक, ऑफिसेस बंद होती. यामुळे नुकसानीचा आकडाही मोठा आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण मंगळवारी झालेल्या बंदमुळे फक्त दिल्लीतच 700 ते 800 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. खरंतर, यामध्ये संपूर्ण देशातील लोकांना मोफत लसीकरण करता आलं असतं.

प्रति व्यक्ती 475 रुपयांचे नुकसान 800 कोटींच्या नुकसानीनुसार, आज दिल्लीतील प्रत्येक नागरिकाचे सुमारे 475 रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणजेच, आज चोवीस तासात दिल्लीत नागरिकांच्या खिशातून 475 रुपये कापले गेले यांची त्यांना कल्पनाही नाही. तुमच्यातील बर्‍याच जणांसाठी ही रक्कम छोटी असेल. पण असं नाही. कारण, भारतात ज्या सीरमच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत तिची किंमतही याच्या आसपास आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सीरमच्या एका डोसची किंमत 250 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना एका दिवसात 475 रुपयांचं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच, चोवीस तासांच्या बंदमध्ये दिल्लीकरांचे जेवढं नुकसान झालं तेवढ्यात कोरोनाचं मोफत लसीकरण करता आलं असतं. (delhi loss due to bharat bandh on 8 december)

इतर बातम्या – 

शेतकऱ्यांचा भारत बंद, अमित शाहांची शेतकरी नेत्यांबरोबर तातडीची बैठक

केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन तयार, पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस?

(delhi loss due to bharat bandh on 8 december)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.