AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेनिसपटू राधिकाच्या वडिलांनी का घातल्या 3 गोळ्या? सर्वात मोठं कारण आलं समोर

दिल्लीत एका वडिलांनी आपल्याच राज्यस्तरीय टेनिसपटू असलेल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. राधिका यादव नावाच्या या मुलीचे वडील दीपक यादव यांनी गावातील टोमणे सहन न होऊन हा कृत्य केले. राधिका स्वयंपाकघरात असताना तिच्या वडिलांनी तिला तीन गोळ्या झाडल्या. .

टेनिसपटू राधिकाच्या वडिलांनी का घातल्या 3 गोळ्या? सर्वात मोठं कारण आलं समोर
radhika yadav
| Updated on: Jul 11, 2025 | 12:49 PM
Share

दिल्लीत एका वडिलांनी आपल्याच टेनिसपटू असलेल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. राधिका यादव असे या मुलीचे नाव असून ती राज्यस्तरीय टेनिस खेळाडू होती. गुरुग्रामच्या सेक्टर-५७ परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. एका क्षुल्लक कारणामुळे राधिकाच्या वडिलांनी तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

राधिका यादव असे मृत टेनिसपटू मुलीचे नाव आहे. तिचे वडील दीपक यादव यांनी तिला गोळ्या घालून ठार केले. राधिका तिच्या घराच्या पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघरात काम करत असताना हा प्रकार घडला. ही हत्या करण्यामागे जे कारण समोर आले आहे, ते खूपच धक्कादायक आहे. दीपक यादव यांनी आपली परवानाधारक .३२ बोअरची रिव्हॉल्वर काढली. पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या. त्यावेळी घरात दीपक यादव, त्यांची पत्नी मंजू यादव आणि राधिका हे तिघेच होते.

मंजू यादव तापाने आजारी असल्याने खोलीत आराम करत होत्या. त्यांना फक्त गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पण हा गोळीबाराचा आवाज ऐकून राधिकाचे काका आणि चुलत भाऊ लगेच स्वयंपाकघरात गेले. तिथे त्यांना राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सुरुवातील तपासात दिशाभूल

यानंतर सुरुवातीला कुटुंबातील काही सदस्यांनी पोलिसांना राधिकाने स्वतःला गोळी मारल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कठोर चौकशी केली. तसेच घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा केले. यानंतर पोलिसांनी दीपक यादव यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दीपक यादवने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दीपक यादव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी राधिकाचे काका कुलदीप यादव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक यादवविरुद्ध हत्या कलम १०३(१) BNS आणि शस्त्र अधिनियम कलम २७(३), ५४-१९५९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मृत्यूचे कारण समोर

यावेळी पोलीस राधिकाच्या मृत्यूची चौकशी करत असताना त्यांनी दीपक यादवला तिची हत्या करण्यामागचे कारण विचारले. त्यावेळी त्यांनी धक्कादायक उत्तर दिले. आरोपी दीपक यादवने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, गावातील लोक मला नेहमी टोमणे मारायचे की तू तुझ्या मुलीच्या कमाईवर जगतो. मुलीच्या पैशांवर मजा करतोय, कधीपर्यंत मुलीच्या कमाईवर जगणार, असे टोमणे त्याला सतत ऐकायला मिळायचे. या टोमण्यांमुळे दीपक यादव खूप मानसिक तणावात होते. याच मानसिक त्रासातून त्यांनी हे भयंकर पाऊल उचलले. राधिका एक खूप चांगली टेनिस खेळाडू होती आणि तिने अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या होत्या. खांद्याला दुखापत झाल्याने तिने सध्या स्वतःची टेनिस अकादमी सुरू केली होती.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.