VIDEO : गुळगुळीत रस्त्यावर धावती कार थेट खड्ड्यात घुसली, जमीन खचल्याने रस्त्यावर भला मोठा खड्डा

दिल्लीतील तो पोलिस त्याच्या मित्राला भेटून द्वारका सेक्टर 18 मधील अतुल्य चौकातून जात होता. त्यावेळी हा रस्ता खचल्याने त्यांची गाडी थेट जमिनीच्या आत घुसली.

VIDEO : गुळगुळीत रस्त्यावर धावती कार थेट खड्ड्यात घुसली, जमीन खचल्याने रस्त्यावर भला मोठा खड्डा


नवी दिल्ली : महाराष्ट्रासह नवी दिल्लीतही मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे खचलेल्या रस्त्यात एक कार अडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कार चालकाला कोणतीही इजा झालेली नाही. दिल्लीतील द्वारका परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील द्वारका परिसरात मुख्य रस्ता खचला होता. या खचलेल्या रस्त्यावर एक चालती कार अडकली. i10 या मॉडेलची ही कार आहे. ही कार दिल्लीतील एका पोलिसाची असल्याचे सांगितले जात आहे.

क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात यश

दिल्लीतील तो पोलिस त्याच्या मित्राला भेटून द्वारका सेक्टर 18 मधील अतुल्य चौकातून जात होता. त्यावेळी हा रस्ता खचल्याने त्यांची गाडी थेट जमिनीच्या आत घुसली. सुदैवाने यात कार चालकाला कोणतीही इजा झाली नाही. दिल्लीतील हा पोलिस अश्वनी पटेल नगर सर्कलमध्ये ट्रॉफिक पोलीस म्हणून कार्यरत आहे. या दुर्घटनेनंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी ही गाडी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतही अशाप्रकारची घटना पाहायला मिळाली होती. मुंबई एका घरासमोर पार्क करण्यात आलेली एक कार चक्क खड्ड्यात गायब झाली आहे. ही कार अवघ्या काही सेकंदात पाण्यात बुडाली. मुंबईच्या घाटकोपर परिसरातील ही घटना आहे. मुसळधार पावसामुळे या भागात बरेच पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे घाटकोपरचा हा भाग भुसभुशीत झाला आहे. कारच्या समोर असलेल्या जमिनीवर खड्डा पडल्यामुळे या खड्ड्यामध्येही चक्क पाणी जमा झाले आहे. याच खड्ड्यात एक कार पडताना व्हिडीओमध्ये दिसत होते.

काही सेंकदात कार गायब

कारसमोरचा खड्डा हा जास्त खोल नसावा असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटते. मात्र, कार जशीजशी या खड्ड्यात जाते; तसेतसे हा खड्डा किती धोकादायक आणि खोल असावा हे आपल्याला समजते. कार खड्ड्यामध्ये पडल्यानंतर ती अवघ्या काही सेकंदामध्ये गायब झाली आहे.

पाहा व्हिडीओ : 

(Delhi Traffic police Car Sinks Completely in Dwarka After Road Caves due to heavy rain)

संबंधित बातम्या : 

मुंबई किती धोकादायक? काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ

बीएमसीच्या पार्किंगमध्ये साचलेलं 20 फूट पाणी ओसरलं, 450 गाड्या नादुरुस्त, वाहनचालकांचा संताप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI