बीएमसीच्या पार्किंगमध्ये साचलेलं 20 फूट पाणी ओसरलं, 450 गाड्या नादुरुस्त, वाहनचालकांचा संताप

बीएमसीच्या पार्किंगमध्ये साचलेलं 20 फूट पाणी ओसरलं, 450 गाड्या नादुरुस्त, वाहनचालकांचा संताप
ठाकूर कॉम्प्लेक्समधील मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमधून गाड्या बाहेर काढण्याचे प्रयत्न

मुंबई : मुंबईत गेल्या शनिवार-रविवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बीएमसीच्या पे अँड पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. जवळपास 20 फूट साचलेलं पाणी आता ओसरलं आहे. त्यानंतर या अंडरग्राऊण्ड पार्किंमध्ये अडकलेल्या रिक्षा आणि इतर गाड्या बाहेर काढायला सुरुवात झाली आहे. मात्र एकही लोकप्रतिनिधी मदतीसाठी न फिरकल्यामुळे चालक-मालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मुसळधार पावसामुळे कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बीएमसीच्या पार्किंग बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात 450 गाड्या अडकल्या. बहुतांश गाड्या बंद पडल्या असून त्या सुरु करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे वाहन चालकांचं एकूण कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

महापालिका-कंत्राटदारांकडे भरपाईची मागणी

मुसळधार पावसामुळे बेसमेंटमध्ये जवळपास 20 फूट खोल पाणी साचलं होतं. पार्किंगमध्ये रात्री उभ्या असलेल्या बाईक, ऑटो रिक्षा, चारचाकी गाड्या पाण्याखाली अडकल्या. पार्किंगमध्ये जाऊन गाडी मालक आता आपापल्या गाड्यांचे हाल पाहत आहेत. नुकसान भरपाई महापालिका किंवा कंत्राटदारांनी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

“भाजप नेते गेले कुठे?” रिक्षाचालकांचा संताप

दरम्यान, रिक्षा चालकांचे सगळी कागदपत्रंही भिजली आहेत. कांदिवली हा भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, नगरसेवक मनिषा यादव यांचा मतदारसंघ आहे. एकही नेता आज मदतीसाठी न आलेयाने रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला आहे. एरवी लहान सहान ट्वीटला उत्तर देणारे हे नेते आज गप्प का, असा सवाल विचारला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेला, नालासोपाऱ्यातील 4 वर्षांचा चिमुरडा अद्यापही बेपत्ता

VIDEO | मुंबईत साचलेल्या पाण्यातून चालताना बापलेक अडखळून पडले, पोलिसाची मदत

VIDEO | मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये 20 फूट पाणी, 400 वाहनं बुडाल्याची भीती

(Mumbai Kandivali Thakur Complex BMC Pay and park water logging drown 450 cars rickshaw taken out)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI