Delhi Violence : ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर शेतकरी नेते बॅकफुटवर, 1 फेब्रुवारीचा ‘संसद मार्च’ स्थगित

शेतकरी संघटनांनी 1 फ्रेबुवारीला होणारा संसद मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी बुधवारी सिंधू बॉर्डरवर पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे.

Delhi Violence : ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर शेतकरी नेते बॅकफुटवर, 1 फेब्रुवारीचा 'संसद मार्च' स्थगित
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 9:55 PM

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी प्रजासत्ताक दिनी पुकारलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे शेतकरी नेते आता काहीसं बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शेतकरी संघटनांनी 1 फ्रेबुवारीला होणारा संसद मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी बुधवारी सिंधू बॉर्डरवर पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. आंदोलनाचा पुढील कार्यक्रम लवकरच ठरवला जाईल असंही राजेवाल यांनी सांगितलं आहे.(Parliamentry march of farmers organization was postpone after delhi violence)

राजेवाल यांनी संसद मार्च स्थगित केल्याची घोषणा करतानाच शेतकरी आंदोलन तोडण्यासाठी सरकार कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर परेडसाठी 2 लाख ट्रॅक्टर आले आणि सर्व जगाची नजय या रॅलीवर होती. मात्र सरकारनं कट रचून पंजाब किसान मजदूर समितीला परेडमध्ये पुढे आणून ठेवलं. त्यांच्यासोबत सरकारचे लागेबांधे होते. आमच्यासाठी प्रत्येक मार्गावर अडथळा निर्माण केला गेला. पंजाब किसान मजदूर समितीच्या लोकांना स्वत: सरकारनेच लाल किल्ला आणि आयटीओवर पाठवलं. दीप सिद्धू सरकारचा खास माणूस आहे. 26 जानेवारीला सर्व पोलिस आपल्या पोलीस चौक्या सोडून गेले आणि त्यांना हिंसा करु दिली, असा आरोप राजेवाल यांनी केला आहे. दरम्यान, आमची काही चूक नसतानाही आम्ही देशवासियांची माफी मागतो. हे शेतकरी आंदोलन सुरुच राहील, असा दावाही त्यांनी केलाय.

३० जानेवारीला देशभरात जनसभा

30 जानेवारीला विविध शेतकरी संघटनांकडून देशभरात जनसभा केल्या जातील. एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जाईल. मात्र 1 फेब्रुवारीला आयोजित संसद मार्च स्थगित करण्यात आला आहे. तो पुढे कधी होईल याची तारीख निश्चित केली जाईल, असंही राजेवाल यांनी सांगितलं आहे.

दीप सिद्धूवर सामाजिक बहिष्कार टाका – योगेंद्र यादव

प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेली ट्रॅक्टर परेड यशस्वी ठरली. त्यात काही घटना या ठरल्याप्रमाणे झाल्या नाहीत. आम्ही त्या घटनांपासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. दीप सिद्धू आणि पंजाब किसान मजदूर समितीच्या कारनामे आम्ही सर्वांसमोर आणले आहेत. ये सरकारने सुनियोजित व्यक्ती होते. आम्ही संपूर्ण देशाला दीप सिद्धूवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत आहोत, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला – दिल्ली पोलिस

Parliamentry march of farmers organization was postpone after delhi violence

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.