उप जिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीची सरकारी रूग्णालयात डिलीव्हरी, कन्यारत्न झाल्याने केला जल्लोष

आपल्या राज्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशात कन्यारत्नाचे आगमन मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्यात आले, अगदी सरकारी रूग्णालयापासून ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

उप जिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीची सरकारी रूग्णालयात डिलीव्हरी, कन्यारत्न झाल्याने केला जल्लोष
parag jain-mpImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 5:01 PM

भोपाळ : सरकारी दवाखाना म्हटले की असुविधांचा भरणा असणारच. त्यात तो दवाखाना जर खेडेगावातला असला तर भलेभले तेथून उपचार करायला घाबरत असतात. अशात आपल्या शेजारच्या मध्य प्रदेशातील एका डेप्युटी कलेक्टरांच्या पत्नीचे बाळंतपण एका सरकारी  रूग्णालयात करण्यात आल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे. या कलेक्टर साहेबांना कन्यारत्न झाल्यानंतर त्यांनी या रूग्णालयापासून ते घरापर्यंत लेकीचे आगमन साजरे करण्यासाठी बँडबाजा वाजवत मिरवणूक काढली.

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक अनुकरणीय अशी घटना घडली आहे. या जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी पराग जैन यांची पत्नी गर्भवती असताना त्यांनी तिला येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिल्यानंतर या अधिकाऱ्याने लेकीचे आगमन जोरदार साजरे केले, त्यासाठी तयारीही शानदार केली. कन्येला रूग्णालयातून घरापर्यंत बँडबाजा वाजविण्यात आला. घराला सजविण्यात आले. पराग जैन यांनी रूग्णालय ते घरापर्यंत नवजात कन्येच्या काढलेल्या मिरवणूकीचा व्हीडीयोही त्यांच्या चाहत्यांनी काढला आहे.

पराग जैन यांना तीन वर्षांनी मुलगी झाली आहे. कन्येच्या जन्माची बातमी मिळताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये अक्षरश: दिवाळी उत्सव साजरा केला.  त्यामुळे लेकीचे आगमन मोठ्या  धूमधडाक्याच्या स्वरूपात साजरे करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. त्यासाठी दवाखाना ते घरापर्यंत वाजतगाजत अगदी दणक्यात मिरवणूक काढण्यात आली. फुलांची तसेच दिव्यांची रोषणाई करण्यात आली. कन्येचा गृहप्रवेश होताच लक्ष्मी पुजा घालण्यात आली. या कन्येचा तुलादान कार्यक्रम करण्यात आला. मुलगा आणि मुलीत काही भिन्न नाही. दोन्हीही समान आहेत. ते म्हणाले की आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. अंतराळापासून विमान उड्डाणापर्यंत महिला कशातही कमी नसल्याचे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.