AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चैतन्यानंदच्या संस्थेत मुलींनी भोगल्या नरक यातना, बाबाचे 5 डर्टी किस्से, नकोते मेसेज अश्लील चाळे आणि…

स्वीट गर्ल..., तुला दुबईत घेऊन जाईल आणि..., बाबाचे 5 डर्टी किस्से जाणून संतापाल, त्यांच्या संस्थानात मुलींनी भोगल्या नरक यातना, त्यांच्यासोबत काय झालं ते अखेर समोर..., पोलिसांची कसून चौकशी सुरु...

चैतन्यानंदच्या संस्थेत मुलींनी भोगल्या नरक  यातना, बाबाचे 5 डर्टी किस्से, नकोते मेसेज अश्लील चाळे आणि...
| Updated on: Sep 27, 2025 | 11:50 AM
Share

Chaitanyananda Saraswati: चैतन्यानंदचे काळेकृत्य समोर आल्यानंतर पुन्हा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्या संस्थेत मुली शिक्षण घेण्यासाठी जात होत्या, त्यात संस्थेत मुलींवर अत्याचार होत होते आणि ही भयान परिस्थिती अनेकांना माहिती देखील होती. पण यावर कोणीच काही बोलत नव्हतं. बाबाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर, परीक्षेत नापास केलं जाईल.. अधी धमकी मुलींना दिली जात होती. असंख्य अपराध करून बाबा आता कोणत्या कोपऱ्या लपून बसला आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत. चैतन्यनंद सरस्वतीच्या शोधात दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहारमध्ये छापे टाकले जात आहेत, परंतु तो अद्याप पकडला गेलेला नाही.

बाबा देश सोडून पळू नये म्हणून लूकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस सर्व मुलींची विचारपूस करत आहेत. ज्यांचा बाबाने लैंगिक छळ केला. असे 5 भयानक किस्से आहेत, ज्यामुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या आणि बाबाची मुलींवर करडी नजर होती.

1 – ‘स्वीट गर्ल…’ तुला दुबईत घेऊन जाईल…

2016 मध्ये FIR दाखल करणारी मुलगी म्हणाली, ‘मी संस्थेत फक्त 8 महिने राहिली. पण ते आठ महिने माझ्या आयुष्यात वाईट काळ होता. त्यानंतर मी तेथील शिक्षण सोडून दिलं. संस्थानात प्रवेश केल्यानंतर बाबाचे वाईट कृत्य सुरु झालेले. तो मला अश्लील मेसेज पाठवू लागला होता. मला सतत बेबी आणि स्वीट गर्ल म्हणायचा… सायंकाळी 6.30 वाजता वर्ग सुटल्यानंतर तो मला ऑफिसमध्ये बोलवायचा आणि घाणेरड्या नजरेनं बघायचा, त्रास द्यायचा. तो मला म्हणालेला, मी तुला दुबईत शिक्षणासाठी घेऊन जाईल आणि संपूर्ण खर्च करेल… तू खूप हुशार आहेस… पण माझ्या जाण्याची तयारी नव्हती… पण स्टाफचा माझ्यावर दबाव असायचा… माझा फोन देखील माझ्याकडून काढून घेतला आणि हॉस्टेलमध्ये मी एकटीच राहच होती…मला कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. तो रात्री माझ्या खोलीत फोनवर मला फोन करायचा. त्याची माझ्यावर गिधाडासारखी नजर होती. एवढंच नाही तर, माझ्यासोबत मथुरेला चल… असं देखील मला म्हणाला. मी माझं सर्व सामान हॉस्टेलमध्ये सोडलं आणि पळून आली… तरी देखील त्याने मला सोडलं नाही. त्याच्याशी संबंधित विद्यार्थी माझ्याकडे आले आणि मला परत येण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. बाबाने त्यांना माझा फोन नंबर आणि पत्ता दिला होता. पण माझ्या वडिलांनी त्या सर्वांना हाकलून लावलं.’

2. ‘बेबी… मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो…’

ऑक्टोबर 2024 मध्ये संस्थेत प्रवेश घेतलेल्या एका पीडितेनं सांगितलं की, तिने प्रवेश केल्यानंतर लगेचच छळ सुरू झाला. दुखापत झाल्यामुळे मी बाबाला एक्स-रे रिपोर्ट पाठवले होते. तेव्हा पासून त्याने माझ्यासोबत वाईट कृत्य करायला सुरुवात केली. मला वाईट मेसेज पाठवू लागला… मेसेजमध्ये म्हणायचा, ‘बेबी… मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो… आज तू सुंदर दिसत आहे. जेव्हा मी विरोध केली तेव्हा बाबाने मला हल्द्वानी पोलिस अधीक्षकांकडून कारवाईची धमकी दिली. त्याने असोसिएट डीनला सांगितलं आणि त्यानंतर डीनने मला त्याच्या मेसेजना उत्तर देण्यास सांगितलं. स्वामीजींनी वरिष्ठांना सर्व मुलींनी त्याच्या मेसेजना उत्तर द्यावे याची खात्री करण्याचे निर्देश दिले. ज्या मुली असं करणार नाहीत त्यांना परीक्षेत नापास केलं जाईल… असा इशारा त्यांनी दिला.’

3. ऐकलं नाही तर तुम्ही अपयशी व्हाल

एका पीडित विद्यार्थ्याने सांगितले की, मार्च 2025 मध्ये बाबाने माझ्यासह काही विद्यार्थ्यांना त्याच्या बीएमडब्ल्यू कारमधून फिरायला नेलं आणि रात्री अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. आम्ही त्याचे मेसेड डिलिट करायचो. जेव्हा त्याने असोसिएट डीनकडे तक्रार केली तेव्हा मदत करण्याऐवजी, त्यांनी मला बाबाला ईमेल लिहून माफी मागण्यास सांगितलं आणि असं न केल्यास नापास करण्यात येईल अशी धमकी देखील दिली.

4. जबरदस्तीने रंग लावला आणि

एका पीडितने सांगितल्यानुसार, होळीच्या दिवशी बाबाने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. तो मला सतत बेबी म्हणायता आणि वाईट स्पर्ष करायचा… असं बाबाने फक्त माझ्यासोबत नाही तर, अनेक मुलींसोबत केलं. रंग लावताना त्याचे हेतू स्पष्ट होते. पण तरीही, आम्ही प्रतिकार करू शकलो नाही.

5. ऋषिकेशमध्ये खोलीत बोलावले आणि…

बाबा अनेक मुलींना बळजबरी ऋषिकेश घेऊन गेला. मुलींना जायचं देखील नव्हतं. त्यानंतर संध्याकाळी बाबा मुलींना त्याच्या खोलीत बालवायचाय… या काळात, बाबा आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता आणि आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आम्ही बाबांच्या कृतींबद्दल आमच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आमचे कॉल ब्लॉक केले. आमचे मानसिक, शारीरिक आणि भावनिक शोषण झाले.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.