AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही वनस्पती घराजवळ लावूच नका, पावसाळ्यात असतं सापांचं सर्वात आवडतं ठिकाण, परिसरात कायम सापं दिसणार

पावसाळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे, पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. अशी देखील काही झाडं असतात, जी त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. अशाच एका झाडाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

ही वनस्पती घराजवळ लावूच नका, पावसाळ्यात असतं सापांचं सर्वात आवडतं ठिकाण, परिसरात कायम सापं दिसणार
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 9:10 PM
Share

उन्हाळा आता संपत आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये देशासह राज्यात आता मान्सूनचं आगमन होणार आहे. पावसाळा हा तसा अल्हादायक ऋतु असतो. या काळात सर्वत्र हिरवळ असते. निसर्ग हिरव्या रंगानं न्हाऊन निघतो. याच काळात अनेक जण ट्रेकला जाण्याचे किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचे, पावसात मनसोक्त भिजण्याचे प्लॅन बनवतात. तसेच मान्सूनच्या आगमनाबरोबरच खरीप हंगामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील आपल्या कामात व्यस्त होतो. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष सध्या मान्सूच्या आगमनाकडे लागलं आहे. मात्र या काळात आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. वेळेत उपचार न मिळाल्यानं अशा घटनांमध्ये काही जणांचा मृत्यू देखील होतो. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ का होते? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी जातं, सांपाच्या बिळात पाणी गेल्यानंतर ते बिळातून बाहेर पडतात. अनेकदा असं देखील होतं की जर जोरदार पाऊस झाला तर सापांची बिळं मातीमुळे बुजली जातात. त्यामुळे देखील साप रस्त्यावर फिरतात आणि सर्पदंशाचा धोका वाढतो.

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची दोन मुख्य कारणं आहेत, ती म्हणजे पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे शेतात गार्डन आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढते. शेतातील पीक देखील वाढलेली असतात. अनेकदा अशा ठिकाणी साप लपून बसतात. वाढलेल्या गवतामुळे आपल्याला सापांचा अंदाज येत नाही आणि त्यांच्यावर पाय पडला किंवा त्यांना धोका जणावला की ते तुम्हाला दंश करतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी घुसतं, अशावेळी साप बिळातून बाहेर पडतात, ते आश्रयासाठी सुरक्षित अंधाऱ्या पंरतु कोरड्या जागेचा शोध घेतात. त्यांना जर अशी जागा तुमच्या घरात सापडली तर ते तुमच्या घरात प्रवेश करतात. अशा स्थितीमध्ये तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी तुम्हाला सर्पदंश होऊ शकतो. या ठिकाणी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर तुम्हाला कुठे साप दिसलाच तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. ते सापांना रेस्क्यू करतील.

आता आपण अशा एका झाडाची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या विशिष्ट गुणांमुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. हे झाड आहे, खाण्याच्या पानाचं ज्याला आपण नागिणीच्या पानाचा वेल असं देखील म्हणतो. हा वेल मोठ्या प्रमाणात वाढतो. सर्व जमिनतीवर किंवा घरावर पसरतो. या ठिकाणी अडचण निर्माण होते, त्यामुळे या वेलीखाली लपण्यासाठी सापांना सुरक्षित जागा सापडते. तसेच या वेलीच्या पानाचा आकार हा मोठा असल्यामुळे पानाखालची जमीन देखील भिजत नाही, त्यामुळे साप या झाडाला पावसाळ्यात आपलं घर बनवतात. अनेकदा अशा झाडांखाली साप आढळून येतात. त्यामुळे पावसाळ्यात हे झाडं कधीही घरात शेजारी लावू नये, असं मानलं जातं.

Follow Us
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते...
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?.

Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?

रोहित शर्माजवळ बसून विराट कोहली झाला भावुक! चाहत्यांना आर अश्विनच्या निवृत्तीची आली आठवण.

रोहित शर्माजवळ बसून विराट कोहली झाला भावुक! चाहत्यांना आर अश्विनच्या निवृत्तीची आली आठवण

Parth Pawar: पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा, बड्या नेत्याचं थेट पत्र; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी?.

Parth Pawar: पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा, बड्या नेत्याचं थेट पत्र; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी?

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे फोटो एकाच बॅनरवर, विविध चर्चांना उधाण, धाराशिवमध्ये...

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे फोटो एकाच बॅनरवर, विविध चर्चांना उधाण, धाराशिवमध्ये..

स्वस्तात मस्त पोस्टपेड प्लॅन हवा ? BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळतात भन्नाट फायदे; किंमत फक्त...

स्वस्तात मस्त पोस्टपेड प्लॅन हवा ? BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळतात भन्नाट फायदे; किंमत फक्त..