AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED चं मोठं पाऊल, फारूक अब्दुल्लांच्या 11.86 कोटींच्या कोणत्या संपत्तीवर कारवाई?

सक्तवसुली संचलनालयाने (ED) शनिवारी (20 डिसेंबर) जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांची 11.86 कोटी रुपयांची संपत्ती संलग्न केलीय.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED चं मोठं पाऊल, फारूक अब्दुल्लांच्या 11.86 कोटींच्या कोणत्या संपत्तीवर कारवाई?
| Updated on: Dec 20, 2020 | 1:49 AM
Share

श्रीनगर : सक्तवसुली संचलनालयाने (ED) शनिवारी (20 डिसेंबर) जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांची 11.86 कोटी रुपयांची संपत्ती संलग्न केलीय. या संपत्तीत त्यांचं श्रीनगरमधील गुपकार रोडवरील घर आणि इतर व्यवसायिक इमारतींचा समावेश आहे. ईडीने बेकायदेशीर आर्थिक व्यवहारविरोधी कायद्यानुसार (PMLA) ही कारवाई केलीय (ED attaches Rs 11 crore 86 lac properties of Farooq Abdullah in JKCA money laundering case).

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ईडीने संलग्न केलेल्या संपत्तीत तीन घरांचा समावेश आहे. यात गुपकार रोडवरील श्रीनगरचं घर, तन्मर्ग तहसील कटिपोरातील आणि जम्मूतील भटंडीच्या घराचा समावेश आहे. याशिवाय श्रीनगरच्या पॉश रेसिडेंसी रोड परिसरातील एका व्यावसायिक इमारतीचाही समावेश आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार 2005 ते 2011 पर्यंत JKCA ला BCCI कडून एकूण 109.78 कोटी रुपये मिळाले. या काळात म्हणजेच 2006 ते जानेवारी 2012 मध्ये फारूक अब्दुल्ला JKCA चे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत बेकादेशीर निुयक्त्या केल्या, असा आरोप त्यांच्यावर आहे.

संबंधित घोटाळ्याचा आरोप 2012 मध्ये सर्वप्रथम करण्यात आला. तेव्हा जेकेसीएचे कोषाध्यक्ष मंजूर वजीर यांनी जम्मू-काश्मीर पोलीस विभागातील माजी महासचिव मोहम्मद सलीम खान आणि पूर्व कोषाध्यक्ष अहसान मिर्जा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वजीर यांच्या तक्रारीनंतर आर्थिक घोटाळ्याशी संबंधित 50 नावांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर फारूक अब्दुल्लांचं JKCA अध्यक्षपद गेलं. ते या पदावर जवळपास तीन दशकं होते.

हेही वाचा :

देशभरात भाजपकडून ‘गुपकर गँग’वर टीका, पण कारगिलमध्ये सत्तेसाठी फारुख अब्दुल्लांशी युती

गुपकार घोषणा: “आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही”, पीपल्स अलायन्सच्या बैठकीत फारुक अब्दुल्ला गरजले

फारुख अब्दुल्लांची ED कडून चौकशी, ओमर अब्दुल्लांचा सुडाचा आरोप

ED attaches Rs 11 crore 86 lac properties of Farooq Abdullah in JKCA money laundering case

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.