देशभरातील धाडसत्राचे पीओकेत पडसाद..खोऱ्यातील दहशतवाद्याचे नेटवर्क हादरले

भारतातील या कारवाईमुळे कॅनडा, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संघटनांच्या प्रमुखांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

देशभरातील धाडसत्राचे पीओकेत पडसाद..खोऱ्यातील दहशतवाद्याचे नेटवर्क हादरले
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 9:57 PM

नवी दिल्लीः अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरुद्ध केलेल्या संयुक्त कारवाईने गुरुवारी देशभर खळबळ माजली. भारतातील विविध 10 ते 11 राज्यांमध्ये असलेल्या पीएफआयवर छापे टाकून कारवाई सुरवात करण्यात आली आहे. तर पाकिस्तानसह परदेशात असलेल्या पीएफआय प्रमुखांची अवस्था आता बिकट झाली आहे. कारण या छाप्यांमध्ये ईडी आणि एनआयएकडून महत्त्वाची कागदपत्रंही ताब्यात घेण्यात आली आहे.

त्याबरोबरच पुरावे-साक्षीदार पकडण्यात आले आहेत. त्यामुळे आता या संघटनेवर ठोस कारवाईचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची पाळंमुळं खरं तर 2005 पासूनच भारतात पसरण्यास सुरुवात झाली होती. तर यामध्ये प्रामुख्याने बांगलादेश, पाकिस्तान आणि कॅनडात असलेली अनेक लोकं भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होती.

त्याच आधारे भारतात सध्या असलेल्या पीएफआयकडून देशद्रोही संघटना विकत घेऊन अशांतता पसरवण्याचे मुख्य काम करण्यात येत होते.

रातोरात गलेलठ्ठ बनण्याच्या जाळ्यात अडकलेल्या पीएफआयला घरी बसून बक्कळ पैसे कमवण्याचा हा मार्ग सोपा आणि जलद होता. त्यामुळे ते स्वतः परदेशात असलेल्या भारतविरोधी कारवाई करणाऱ्या शक्तींच्या समर्थनात ते होते.

भारताविरोधी कारवाया करताना पीएफआय आणि परदेशात बसून पैशांच्या जोरावर भारताविरुद्ध दिशाभूल करणारे लोक कोणत्याही प्रकारे त्यांचे नाव थेट भारतीय तपास यंत्रणांच्या नजरेत कधीही जाणार नाही याची विशेष काळजी घेतली जात होती.

कारण अशा संघटनांना माहिती होते की, अशा एजन्सींवर थेट कारवाया करण्यासाठी भारतीय तपासय यंत्रणा कधीही मागे हटणार नाहीत.

त्यामुळेच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडूनही काही काळातच अनेक पीएफआयच्या तळांवर छापे टाकण्यात आले होते. त्यातील अनेकांवर कारवाई करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले होते.

ईडी आणि एनआयएने संयुक्तपणे गुरुवारी देशातील 10-11 राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले त्याच वेळी भारतीय तपास यंत्रणांनी सिद्ध केले की अशा संघटना असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करायला भारतीय तपास यंत्रणांना वेळ लागत नाही.

आतापर्यंत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून देशातील पीएफआय तळांवर सर्वाधिक छापे टाकले गेले आहेत. गुरुवारी भारतात 10-11 राज्यांमधील पीएफआय तळांवर छापे टाकले गेले. मात्र परदेशातील काही जण लपून बसले आहेत.

भारतातील या कारवाईमुळे कॅनडा, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संघटनांच्या प्रमुखांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.