VIDEO : या जगात माणुसकी शिल्लक आहे का? हत्तीला निर्दयीपणे मारहाण

VIDEO : या जगात माणुसकी शिल्लक आहे का? हत्तीला निर्दयीपणे मारहाण

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोन माणसं एका हत्तीला अमानुषपणे काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत (Elephant tied with tree and hit brutality by sticks at camp Video Viral).

चेतन पाटील

|

Feb 22, 2021 | 3:53 PM

चेन्नई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोन माणसं एका हत्तीला अमानुषपणे काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या हत्तीला एका झाडाला बांधलं आहे. तामिळनाडूच्या कोयंबटूर येथून 50 किमी अंतरावर ठेक्कमपट्टी येथे असलेल्या एका कॅम्पमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सकडून संताप व्यक्त केला जातोय (Elephant tied with tree and hit brutality by sticks at camp Video Viral).

नेमकं व्हिडीओत काय?

व्हिडीओत दोन अंकुश हत्तीला अमानुषपणे मारत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यांचा मार सहन करणारा हत्ती जोरजोरात व्हिव्हळत आहे. हत्तीला मारहाण झाल्याचा हा व्हिडीओ बघितला तर खरंच या जगात माणुसकी शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय (Elephant tied with tree and hit brutality by sticks at camp Video Viral).

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हत्तीला मारहाण करणाऱ्या अंकुशांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र, त्या अंकुशांवर अद्याप तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. हत्तीला मारहाण करणाऱ्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा व्हावीच, अशी मागणी अनेक लोकांनी केली आहे.

याआधीही हत्तीसोबत अमनुषपणे वागण्याच्या घटना घडल्या

हत्तीला मारहाण करण्याची किंवा हत्तीसोबत अमानुषपणे वागण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीदेखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या महिन्यात काही माथेफिरुंनी रात्रीच्या अंधारात हत्तीच्या डोक्यावर जळालेलं टायर फेकल्याची घटना समोर आली होती. हा व्हिडीओदेखील तामिळनाडूतीलच होता. तामिळनाडूच्या नीलगिरी भागात हा क्रूरप्रकार घडला होता.

गेल्यावर्षी काही नराधमांनी एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाण्यास दिल्याची घटना समोर आली होती. हत्तीणीने ते अननस खात असताना त्याचा स्फोट झाला आणि त्यामध्ये हत्तीणी मेली. हत्तीणीसोबत तिच्या पोटातील बाळही मेलं. या घटनेत हत्तीणी प्रचंड रक्तबंबाळ झाली होती. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र, त्यानंतरही अशा प्रकारच्या घटना घडणे ही दुर्देवाची बाब आहे.

हेही वाचा : गडचिरोलीत हत्ती गाळात रुतला, तडफडून थकला, 20 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें