नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीच्या कारवाया देशभरात गाजत आहेत. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या मागेही ईडीचं शुक्लकाष्ट सुरु आहे. संजय राऊतांना (Sanjay Raut) आता 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे मागील महिन्यात दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही ईडी चौकशीला बोलावण्यात आलं होतं. आता ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला टाळं ठोकलंय. यंग इंडियाचं कार्यालयही सील करण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांना हवाला लिंकडूनही काही पुरावे मिळाले आहेत.