कोव्हिडजागृती करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने बळी, IMA चे माजी प्रमुख केके अगरवाल यांचे निधन

डॉ. अग्रवाल यांनी कोरोन लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. | Dr KK Aggarwal coronavirus

कोव्हिडजागृती करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने बळी, IMA चे माजी प्रमुख केके अगरवाल यांचे निधन
डॉ. के.के. अग्रवाल

नवी दिल्ली: इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रमुख डॉ. के.के. अग्रवाल यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. डॉ. के.के. अग्रवाल (Dr KK Aggarwal ) हे नाव भारतीय वैद्यकक्षेत्रात सुपरिचीत होते. आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. (Dr KK Aggarwal Ex Chief Of India Medical Association Dies Of COVID 19)

गेल्यावर्षी देशात कोरोनाची साथ आल्यापासून डॉ. अग्रवाल हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने प्रबोधनाचे काम करत होते. त्यांचे माहितीपूर्ण व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही व्हायचे. डॉ. अग्रवाल यांनी कोरोन लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. परंतु, सोमवारी रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर कुटुंबीयांनी डॉ.अग्रवाल यांच्याच ट्विटर अकाऊंटवरून एक निवेदन प्रसिद्ध केले.

डॉ. अग्रवाल यांनी वैद्यकीय पेशात आल्यापासून कायम समाजकल्याण आणि आरोग्यविषयक प्रबोधनाचे कार्य केले. कोरोनाच्या संकटकाळातही लोकांची भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी अनेक माहितीपूर्ण व्हीडिओ तयार केले होते, असे या निवेदनात म्हटले आहे.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, चार लाखांहून अधिक डिस्चार्ज

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 63 हजार 533 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत 18 हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात देशात 4 लाख 22 हजार 436 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचा आकडा चार लाखांच्या पार गेला आहे.

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरण्याचे संकेत, बाधितांच्या संख्येत मोठी घट

जन्म एकत्र, मृत्यू एकत्र; 24 व्या वाढदिवशी कोरोना संसर्ग, जुळ्या भावांचा पाठोपाठ मृत्यू

कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं, AIIMS आणि ICMR कडून नवीन मार्गदर्शक सूचना

(Dr KK Aggarwal Ex Chief Of India Medical Association Dies Of COVID 19)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI