National Girl Child Day| राष्ट्रीय बालिका दिवस का साजरा केला जातो, काय आहे या विशेष दिनाची यंदाची थीम, घ्या जाणून…

National Girl Child Day| राष्ट्रीय बालिका दिवस का साजरा केला जातो, काय आहे या विशेष दिनाची यंदाची थीम, घ्या जाणून...
Girls in India (PTI file photo)

राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास नेमकी सुरुवात कधी झाली तर 2009 सालापासून देशात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 24, 2022 | 8:31 AM

भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस (National Girl Child Day) साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात(India)  24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.   दरवर्षी एका विशिष्ट्य थीम ठरवली जाते. त्या थीमला अनुसरू हा दिवस साजरा केला जातो. काय आहे राष्ट्रीय बालिका दिवस अन यंदा  थीम …

अशी झाली राष्ट्रीय बालिका दिवसाची सुरुवात   दरवर्षी साजऱ्या होतो. पण या राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास नेमकी सुरुवात कधी झाली तर 2009 सालापासून देशात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

24 जानेवारीच का? राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारीलाच साजरा करण्यामागे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. या दिवशी इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. भारताच्या इतिहासात महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.

मुख्य उद्देश राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींना , महिलांना त्याचे असलेले हक्क, अधिकार याबाबत जागृत करणे होय. इतकेच नव्हे तरआजही समाजात मुलींसोबता होत असलेले भेदभाव नष्ट करत , समाजाकडे मुलगा-मुलगी यांच्याकडे सामान दृष्टीकोनातून बघण्याचा दृष्टीकोन तयार करणे , समाजामध्ये जागृती करणे हा होय.

यंदाची थीम दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करत असताना एका विशिष्ट थीम ठरवली जाते. गतवर्षी 2021 मध्ये डिजिटल पिढी , आमची पिढी ही थीम घेण्यात आली होते. यंदा 2022 मध्ये प्रामुख्याने ‘उज्ज्वल उद्यासाठी , मुलींना सक्षम करा’ ही थीम ठरवण्यात आली आहे.

या राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमिताने मुलींना आपल्या संविधानिक हक्क व अधिकाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

  • कलम 14 – मूलभूत अधिकार व कायद्यासमोर सर्व समान
  • कलम  15 – वंश, धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध
  • कलम 16- सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता
  • कलम 19 -भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य
  • कलम 21- जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण,
  • कलम 21 – गोपनीयतेचा अधिकार,
  • कलम 300 अ – मालमत्तेचा अधिकार

दिल्ली काबीज करु… बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट

जमलेल्या माझ्या तमाम….! शिवसैनिकांना उद्देशून उच्चारलेला उद्धव ठाकरेंचा शब्दान शब्द.. जसाच्या तसा

डिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें