Ahmedabad Fire : शाळेच्या इमारतीत भीषण अग्नीतांडव, सर्वांना सुखरुप बाहेर काढलं

Ahmedabad Fire : शाळेच्या इमारतीत भीषण अग्नीतांडव, सर्वांना सुखरुप बाहेर काढलं
Ahmadabad School Got Fire

अहमदाबादच्या कृष्णानगर परिसरातील एका शाळेत आग लगनल्याची घटना पुढे आली आहे. अंकुर स्कूल (Fire in Ahmedabd Ankur School) या शाळेत अचानक आग लागली.

Nupur Chilkulwar

|

Apr 09, 2021 | 4:13 PM

अहमदाबाद : अहमदाबादच्या कृष्णानगर परिसरातील एका शाळेत आग लगनल्याची घटना पुढे आली आहे. अंकुर स्कूल (Fire in Ahmedabad Ankur School) या शाळेत अचानक आग लागली. या आगीत 4 विद्यार्थी अडकल्याची भीती होती (4 Students Stuck in School). या घटनेची माहिती मिळताच अग्निशमंन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शाळेच्या इमारतीमधून आगीचे मोठ मोठाले लोळ उठत होते (Fire in Ahmedabad Ankur School).

अग्निशमन दलाच्या (Fire Brigade on Spot)  जवानांनी इमारतीत अडकलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग प्रॉसेस सुरु आहे. शाळेच्या इमारतीतून आगीचे मोठ मोठाले लोळ उठत होते. मात्र, अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रम मिळवण्यात यश आलं आहे

पण, अशात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, सध्या कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. मग या शाळेत विद्यार्थी आले कुठून. या शाळेत आग कशी लागली याबाबत सध्या काहीही माहिती नाही.

आगीत 4 मुलं अडकल्याची माहिती –

पाहा या घटनेचा व्हिडीओ –

Fire in Ahmedabad Ankur School

संबंधित बातम्या :

Kurla Fire : कुर्ल्यात मोटर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें