स्वातंत्र्य दिनापासून कोरोनामुक्तीच्या लढ्याला वेग, 15 ऑगस्टपर्यंत लस येण्याची शक्यता

भारतातील पहिली कोरोना लस 15 ऑगस्टला बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी आयसीएमआरने कंबर कसली आहे. (First Indian Corona virus Vaccine).

स्वातंत्र्य दिनापासून कोरोनामुक्तीच्या लढ्याला वेग, 15 ऑगस्टपर्यंत लस येण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारतातील पहिली कोरोना लस 15 ऑगस्टला बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे (First Indian Corona virus Vaccine). यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. आयसीएमआरने लस परिक्षण आणि चाचणीचा वेग वाढवला असून 15 ऑगस्टपूर्वीच याबाबतच्या सर्व चाचण्या पूर्ण होण्यासाठी संबंधित संस्थांना आदेश देण्यात आले आहेत. आयसीएमआरने भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडेटसोबत भागीदारी करत कोरोना लस उपलब्ध करण्याचं काम हाती घेतलं आहे. या कामाला पहिलं प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच या कामात हलगर्जपणा करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

कोरोनावरील लस बीबीव्ही 152 कोविड लस माणसांना देऊन त्याचा मानवी शरीरावरील परिणाम तपासला जाणार आहे. यासाठी जवळपास 10-12 वेगवेगळ्या संस्थांना हे काम देण्यात आलं आहे, अशी माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. आयसीएमआरने या संस्थांना हे काम करताना सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितलं आहे. तसेच सरकारसाठी हे पहिलं प्राधान्य असून या कामावर सरकारचं संपूर्ण लक्ष असल्याचंही या संस्थांना सांगण्यात आलं आहे.

कोरोनाची ही लस आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे यांनी एकत्रित केलेल्या कामातून विकसित केली आहे. यानंतर आयसीएमआर आणि भारत बायोटेक संयुक्तपणे पूर्व वैद्यकीय आणि वैद्यकीय विकासावर काम करत आहेत. आयसीएमआरने चाचणी करणाऱ्या संस्थांना पाठवलेल्या पत्रात संबंधित कोरोना लस 15 ऑगस्टला नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यापूर्वी सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण व्हाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आयसीएमआरने म्हटलं आहे, “या कामाचं अंतिम साध्य या कामात सहभागी सर्व संस्थांनी वैद्यकीय चाचण्यांच्या कामात केलेल्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे. सर्व संस्थांनी आपल्या वैद्यकीय चाचण्यांच्या कामाला याच आठवड्यात सुरुवात करावी. त्यासाठी या मंजूरी संबंधातील कामांना वेग द्यावा. या कामातील हलगर्जीला गांभीर्याने घेतलं जाईल. त्यामुळेच तुम्हाला या प्रकल्पावर सर्वोच्च प्राधान्यक्रमासह काम करण्याची सूचना देण्यात येते. तसेच यात कोणतीही कमतरता न ठेवता वेळेच्या मर्यादांचं पालन करावं.”

या कोरोना लस वैद्यकीय परिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या संस्थांमध्ये विशाखापट्टनम, नवी दिल्ली, पटणा, बेळगाव, नागपूर, गोरखपूर, कट्टनकुलाथूर (तामिळनाडू), हैदराबाद, आर्यनगर – कानपूर आणि गोव्याच्या संस्थांचा समावेश आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील लस शोधण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. मात्र, अद्याप सार्वजनिक स्तरावर वापरता येईल अशी एकही लस अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. असं असलं तरी अनेक लस विकसित होत असून त्यांचं माणसांवर परिक्षणही सुरु आहे. यात काही लसचा चांगला उपयोग होत असल्याचं प्राथमिक टप्प्यात निदर्शनास आलं आहे.

हेही वाचा :

Covaxin | गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली लस तयार, सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगी

First Indian Corona virus Vaccine

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *