थाटामाटात विवाह करुन मुलीची पाठवणी केली, पण लेक सासर पोहचत नाही तोच घडली दुर्दैवी घटना, वऱ्हाडी मंडळी पुन्हा…

मुलीचे लग्न आनंदाने पार पाडून तिच्या घरचे इतर वऱ्हाड्यांसह घरी परतत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लेक सासरी पोहचत नाही तो माता-पित्यांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला.

थाटामाटात विवाह करुन मुलीची पाठवणी केली, पण लेक सासर पोहचत नाही तोच घडली दुर्दैवी घटना, वऱ्हाडी मंडळी पुन्हा...
लग्नाहून परतताना वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघातImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 7:12 PM

गुमला : मुलीचे लग्न थाटामाटात पार पाडून तिची पाठवणी करत सर्व वऱ्हाडी आपल्या गावी परतत होते. मात्र वाटेतच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी तीन वेळा पलटली आणि अपघातग्रस्त झाली. या अपघातात नवरी मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 28 जण जखमी झाले असून, 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांना उपचारासाठी रिम्समध्ये रेफर करण्यात आले आहे. गुमला येथील डुमरी ब्लॉकमध्ये ही घटना घडली. मुलीचे वऱ्हाडी लग्नानंतर पिकअप व्हॅनमधून डुमरी येथील सारंगडीह येथून आपल्या घरी कटारी येथे परतत होते. गाडीत 45-55 जण होते. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला.

जखमींपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बसमधून चैनपूर उपआरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक उपचारानंतर 12 गंभीर जखमींना सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. यातील तिघांना सदर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रिम्समध्ये पाठवले. मृतांमध्ये मुलीची आई लुंडारी देवी, वडील सुंदर गैर यांचा समावेश आहे. तर सविता देवी, पुलीकर किंदो, अलसू नागेशिया अशी अन्य मृतांची नावे आहेत.

लग्नघरांवर शोककळा

लग्नानंतर मुलीला निरोप देण्यात आला. त्यानंतर मुलीच्या बाजूचे सर्व लोक पिकअपमधून घरी येत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. त्यांनी सांगितले की, अपघातानंतर वधू-वरांच्या घरावर शोककळा पसरली आहे. घरात मंगलकार्य घडल्यानंतर काही तासातच लग्नघरात शोककळा पसरली आहे. मुलीच्या पाठवणी करुन डोळ्यांच्या कडाही सुकल्या नव्हत्या, अन् अचानक जे घडले त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.