AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र

नोकरशाहांनी शनिवारी पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं आहे. कोणत्याही शंकांचं निरसन करण्यासाठी आणि जनतेला उत्तर देण्यासाठी पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.

पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
| Updated on: Jan 17, 2021 | 12:29 PM
Share

नवी दिल्ली : पीएम केअर पंडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 100 माजी नोकरशहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोकरशहांनी शनिवारी पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं आहे. कोणत्याही शंकांचं निरसन करण्यासाठी आणि जनतेला उत्तर देण्यासाठी पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.(Former bureaucrat’s letter to PM Narendra Modi to bring transparency in PM care fund)

पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे माहितीच्या अधिकारात पीएम केअर फंडाबाबत माहिती देण्यास नकार देण्यात आला होता आणि हे सार्वजनिक प्रकरण नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिल्याचं या नोकरशहांनी सांगितलं आहे. जर पीएम केअर फंड सार्वजनिक नाही तर मग पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री जे सरकारचे सदस्य आहेत ते आपलं पद, नाव आणि अधिकारांच्या मदतीनंच या फंडमध्ये ट्रस्टी आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पत्र लिहिणाऱ्यांमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांची नावं

पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी 100 माजी नोकरशहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. यात अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. माजी आयएएस अनिता अग्निहोत्री, एसपी एम्ब्रोस, सज्जाद हसन, हर्ष मंडेर, अरुणा राय, देव मुखर्जी, सुजाता सिंह, एससी बहर, के सुजाता राव, एएस दुलत यांसारख्या 100 अधिकाऱ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

आज अनेक राज्य कोरोनासारख्या महामारीनं ग्रस्त आहेत. हे राज्य या महामारीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. पीएम केअर फंडातून अशा राज्यांना मदत मिळावी असं आमचं मत असल्याचं माजी नोकरशाहांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या : 

सावधान! KYC च्या नावाने ग्राहकांची फसवणूक, SBI बँकेचा मोठा इशारा

PM Narendra Modi : भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी

Former bureaucrat’s letter to PM Narendra Modi to bring transparency in PM care fund

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.