Lairai Jatra Goa : जळत्या अंगाऱ्यांवर अनवाणी पायांचा ठाव, गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत अजून काय काय?
Goa Shirgao Lairai Jatra Stampede : गोव्यातील शिरगावातील प्रसिद्ध श्री लैराई मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली. येथे दरवर्षी मोठी जत्रा भरते. धोंडाची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

गोव्यातील श्री लैराई देवी मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली. शिरगावातील या यात्रेत चेंगराचेंगरी झाली. त्यात 7 भाविकांचा जीव गेला. तर 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. गोवा राज्यातील ही यात्रा प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मोठी जत्रा भरते. धोंडाची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. याठिकाणी मोठी गर्दी असते.
अंगाऱ्यावर चालतात भाविक
धोंडाची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध आहे. येथे एक परंपरा जपली जाते. येथे भाविक भक्त जळत्या अंगाऱ्यांवर अनवाणी पायाने चालतात. गोवातील लैराई देवी मंदिरातील चेंगराचेंगरीचे कारण अद्याप समोर आले नाही. ही चेंगराचेंगरी कशामुळे झाली याचा तपास करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी अजून मयतांची नावे सांगितलेली नाही.
मुख्यमंत्री पत्नीसह जखमींच्या चौकशीला
घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली जखमींना गोवा मेडिकल कॉलेज (GMC), बांबोलिम आण उत्तरी गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मापूसा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत पण उपस्थित होत्या. राज्यसभेचे खासदार सदानंद शेत तनावडे आणि आमदार उपस्थित होते.
एक हजार पोलिसांचा बंदोबस्त
प्रत्येक वर्षी श्री लैराई देवीची जत्रा भरते. या यात्रेसाठी गोवा आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक येतात. या वर्षी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चोख बंदोबस्तासाठी 1 हजार पोलीस तैनात होते. गर्दीवर नजर ठेवण्यासाठी आणि नियंत्रणासाठी ड्रोनची पण व्यवस्था करण्यात आली होती. इतकी व्यवस्था आणि खबरदारी घेऊन सुद्धा स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि 7 जणांना जीव गमवावा लागला. श्री लैराई यात्रा दरवर्षी उत्तरी गोवामध्ये होते. यामध्ये 50,000 हून अधिक भाविक येतात. ही यात्रा खूप प्रसिद्ध आहे. उताराच्या ठिकाणी ही चेंगराचेंगरीची घटना घडली. उतार असल्याने अनेक जण पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
