AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटे 3 वाजताच घात झाला…मंदिराजवळच आला मृत्यू, कोळगाव शिवारात भीषण अपघातात चार ठार; एकाच कुटुंबातील…

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घारगाव-कोळगाव रोडवरील माऊली मंदिराजवळ पहाटे भीषण अपघात झाला. ट्रक आणि इको कार यांच्यात झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पहाटे 3 वाजताच घात झाला...मंदिराजवळच आला मृत्यू, कोळगाव शिवारात भीषण अपघातात चार ठार; एकाच कुटुंबातील...
भीषण कार अपघात
| Updated on: Feb 24, 2026 | 11:36 AM
Share

अहिल्यानगर येथे एक भीषण अपघात घडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ वाहानांची भीषण धडक होऊन मोठ्ठा अपघात झाला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तिघे हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. ट्रक आणि इको कार समोरासमोर येऊन भीषण धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहानांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. एकाच कुटुंबाती तिघांनी जीव गमावल्यामुळे कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.

एकाच कुुटंबातील तिघे गेले, मुलगा वाचला

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ दोन वाहनांची धडक झाली. इकोकार आणि ट्रक एकमेकांवर प्रचंड वेगाने आदळले. या अपघातात कारचालकासह आणखी तिघांचा, एकूण 4 नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी तिघे जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे . नितीन कोकाटे (कारचालक), गजानन पायघन, ध्रुपता पायघन, वैभव पायघन अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.

तर याच कारमध्ये करण पायघन हा 13 वर्षांचा मुलगाही होता. अपघाता त्याचा जीव वाचला मात्र त्याला जबर मार लागला आहे. त्याच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात होताच ट्रक ड्रायव्हर मात्र घटनास्थळावरू लागलीच पळाला, तो फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसा ठाण्यातील अधिकाऱ्यांवी घटनास्थळी धाव घेतली, गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पायघन कुटुंबीय हे मूळचे अकोले जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील रहिवासी आहेत. मात्र कामानिमित्त ते श्रीगोंदा येथील चिंभळे गावात रहात होते. मंगळवारी पहाटे ते गवाहून चिंभळे येथे परत येत होते, तेव्हाच तीनच्या सुमारासदौंड येथून नगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची माऊली मंदिराजवळ त्यांच्या कारला धडक बसली आणि अपघात झाला. बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रक ड्रायव्हरचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...